ऐश्वर्याचा पती अभिषेकसोबत 'तो' फोटो पाहाताचं अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया

ऐश्वर्या आणि अभिषेकचा 'तो' फोटो अखेर समोर... त्यावर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया  

Updated: Apr 22, 2022, 12:21 PM IST
ऐश्वर्याचा पती अभिषेकसोबत 'तो' फोटो पाहाताचं अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : बी-टाऊनचं सर्वात आवडतं जोडपं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... दोघांनी त्यांचं पती-पत्नीचं नातं अतिशय सुंदरपणे जपले आहे. बॉलिवूडमध्ये अनेक जोडप्यांचं लग्नानंतर काही वर्षात घटस्फोट झालं... पण ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं लग्नाच्या 15 वर्षांनंतरही  टिकून आहे. मुलीच्या जन्मानंतर देखील दोघे एकमेकांच्या आवडी-निवडीकडे लक्ष देत असतात. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याची ओळख  पॉवर कपल म्हणून देखील होते

20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न झालं. याच दिवसाचं औचित्य साधत ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ऐश्वर्याने लग्नातील एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये दोघांचे हात दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

फोटोवर खुद्द अभिषेकने देखील कमेंट केली. एवढंच नाही तर ऐश्वर्याचे सासरे आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील मुलाच्या आणि सुनेच्या फोटोवर कमेंट केली आहे. 

मुलगा आणि सुनेच्या फोटोवर कमेंट करत ते म्हणाले, 'कायमचं एकत्र प्रेम...' सध्या ऐश्वया-अभिषेकचा फोटो आणि त्यावर बिग बींनी दिलेली प्रतिक्रिया तुफान व्हायरल होत आहे.