आलिया-रणबीरला जॉईन करायचा आहे करणचा सिक्रेट व्हॉट्स ऍप ग्रुप...मात्र कोणी दिला नकार

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करणने रणबीर-आलियाबद्दल इंट्रेस्टिंग खुलासा केला आहे.

Updated: Apr 22, 2022, 11:04 AM IST
आलिया-रणबीरला जॉईन करायचा आहे करणचा सिक्रेट व्हॉट्स ऍप ग्रुप...मात्र कोणी दिला नकार title=

मुंबईः बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर नेहमी त्याच्या मुलाखतींमधून नवनवे खुलासे करत असतो. सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत त्याचे चांगले संबंध आहेत. 

कॉफी विथ करण हा त्याचा शो मुलाखतींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र एका यू ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत करणने रणबीर-आलियाबद्दल इंट्रेस्टिंग खुलासा केला आहे.

करण जोहरने या मुलाखतीत सांगितलं की, त्याचा एक व्हॉट्स अप ग्रुप आहे ज्यामध्ये जॉईन करण्यासाठी रणबीर-आलियाने खूप प्रयत्न केले मात्र त्यांना ग्रुपमध्ये ऍड करण्यास एका व्यक्तीने नकार दिला.

ज्या व्यक्तीने नकार दिला ती रणबीर-आलियाच्या खूप जवळची आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे अयान मुखर्जी. अयान मुखर्जीने या दोघांना ग्रुपमध्ये घेण्यास का नकार दिला त्याचं कारणंही करणने या मुलाखतीत सांगितलं.

करणने सांगितलं की एक व्हॉट्स ऍप ग्रुप आहे ज्याचं नाव A लिस्ट आहे. Aने नावाची सुरुवात होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या ग्रुपमध्ये आहेत. 

सिनेमाचे ट्रेलर या ग्रुपवर शेअर केले जातात मग त्यावर रिव्ह्यू दिला जातो. कोणतेही सेलिब्रिटी या ग्रुपमध्ये नाहीत. 

आणि ग्रुपमधल्या कोणत्याही गोष्टी कोणालाही फॉरवर्ड केल्या जात नाहीत. त्यामुळे अयान मुखर्जीने या दोघांना ग्रुपमध्ये ऍड करण्यास नकार दिला.