लग्नानंतर विकी-कतरिना मुंबईत परतले, पाहा सौभाग्यवती कतरिनाचे फोटो

बहुचर्चित आणि प्रतिक्षित असा विकी कौशल आणि कतरिना कैफचा लग्न सोहळा नुकताच पार पडला.

Updated: Dec 14, 2021, 06:01 PM IST
लग्नानंतर विकी-कतरिना मुंबईत परतले, पाहा  सौभाग्यवती कतरिनाचे फोटो title=

मुंबई : बहुचर्चित आणि प्रतिक्षित असा विकी कौशल आणि कतरिना कैफचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर विकी कौशल आणि कतरिनाने आपल्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवर शाही लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पाहू शकत अगदी शाही थाटात हा लग्न सोहळा पार पडला आहे. या लग्नात सगळ्यात आकर्षणाची बाब म्हणजे, या दोघांचे लूक यावेळी  कतरिनाने सुंदर लाल रंगाचा लेहंगा घातला होता. तर विकी कौशलने पारंपरिक कुर्ता घातल्याचं दिसत आहे. 

या जोडीचं लग्न पार पडल्यानंतर या दोघांनी मुंबईत एंट्री घेतली आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच हे सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाले. या दोघांचे यावेळचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी विकी-कतरिनाने फोटोग्राफर्सना पोजदेखील दिल्या. यावेळी कतरिना लाईट पिंक कलरचा चुनीदार परिधान केला होता याचबरोबर हातात लाल चूढा, आणि सिंदूर अशा नववधूच्या अवतारात कतरिना खूप साधी-सिंपल आणि सुंदर दिसत होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राजेशाही थाटात लग्न पार पडल्यानंतर हे दोघं आता मुंबईत आले आहेत. बऱ्याच फॅन पेजेसवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.  सर्वच स्तरांतून विकी आणि कतरिनावर शुभेच्छांचा वर्षावही करण्यात येत आहे. अनेक नियम, माध्यमांवरील बंदी असतानाही या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे चाहत्यांमध्ये भलताच आनंद पाहायला मिळत आहे.