ऑस्कर सोहळ्यानंतर रंगली पार्टी, प्रियंका-निकचे फोटो व्हायरल

ऑस्कर २०१९च्या चर्चांना चांगलेच उधान आले होते. ऑस्कर सोहळ्यानंतर सिताऱ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते.

Updated: Feb 26, 2019, 06:13 PM IST
ऑस्कर सोहळ्यानंतर रंगली पार्टी, प्रियंका-निकचे फोटो व्हायरल title=

मुंबई : ऑस्कर २०१९च्या चर्चांना चांगलेच उधान आले होते. ऑस्कर सोहळ्यानंतर सिताऱ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते आणि या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियवर चांगलेच व्हायरल होत आहेत. या पार्टीमध्ये चाहत्यांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूड गायक निक उपस्थित होते. पती निकने स्वत:च्या टि्वटर अकाउंटवरून दोघांचे फोटो पोस्ट केले आहे. 

या फोटो मध्ये दोघेही फार आनंदी दिसत आहेत. प्रियंकाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तर दुसरीकडे निकने निळ्या रंगाचा जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. 

Oscars 2019 मोठ्या दिमाखात पार पाडला. अनेक हॉलिवूड कलाकारांनी या सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवली. सिनेजगतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि मानाचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. संपूर्ण पुरस्कार सोहळ्यात विजेता म्हणून कोणाची घोषणा होणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर And the Oscar goes to.... असे म्हणत एक- एक नाव जाहीर होत गेलं आणि पुरस्कार सोहळ्याची रंगत आणखीनच वाढत गेली. ऑस्करच्या रेड कार्पेटवर आणि कलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करणारा होता.