'मलंग', 'राझी'नंतर अमृता खानविलकर दिसणार 'या' वेब सीरिजमध्ये!

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर आता दिसणार एका वेगळ्या भूमिकेत... 'मलंग', 'राझी'नंतर आता 'या' वेब सीरिजमध्ये दिसणार

दिक्षा पाटील | Updated: Mar 15, 2024, 05:45 PM IST
'मलंग', 'राझी'नंतर अमृता खानविलकर दिसणार 'या' वेब सीरिजमध्ये! title=

Amruta Khanvilkar : मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृता कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मग त्यात तिचे असणारे फॉलोवर्स झाले किंवा तिच्या सोशल मीडिया पोस्ट. अमृता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साधणारी अमृता आता आणखी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 

अमृता लवकरच 'लुटेरे' या नव्या कोऱ्या हिंदी वेब सीरिज मधून पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये झळकणार आहे. अमृताने आजवर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना मोहित केलं आणि पुन्हा एकदा ती नव्या बॉलिवूड प्रोजेक्टसाठी सज्ज झाली आहे. हा नवा प्रोजेक्ट तिच्यासाठी खूप खास आहे आणि त्याच कारण देखील तितकंच खास आहे. 'लुटेरे' मध्ये अमृता अनेक दिग्गज बॉलिवूड मधल्या कलाकारांच्या सोबतीने दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आगामी वेबसीरिज 'लुटेरे' बद्दल बोलताना अमृता म्हणते "खूप दिवसांनी एक क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये काम करताना खूप आनंद होतोय. सोबतीनं हंसल सर आणि जय मेहता यांच्या सोबत काम करण्यची अनोखी संधी मला मिळाली आहे. 2024 या वर्षातला माझा हा पहिला हिंदी प्रोजेक्ट असून एवढ्या कमालीच्या कलाकारांसोबत काम करण्याचा योगायोग सुद्धा जुळून आला."

'स्कॅम 1992' आणि 'स्कूप' सारख्या सुपरहीट वेबसीरिज देणाऱ्या हंसल मेहता यांच्या आगामी ‘लुटेरे’ या वेब सीरिजचा अमृता एक महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीसाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे. याचं दिग्दर्शन कमल जय मेहता करत असून 'डिस्ने प्लस हॉटस्टार' वर येत्या 22 मार्चला ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अमृता खानविलकरसोबत रजत कपूर, विवेक गोंबर आणि आमिर अलीसारखे दमदार कलाकार झकाळणार आहेत.

हेही वाचा : तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना 'या' विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा

आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. आगामी काळात अमृता 'लुटेरे'च्या सोबतीनं 'कलावती' , 'पठ्ठे बापूराव', 'ललिता बाबर' या सारख्या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. 2024 वर्षात अमृता विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार यात शंका नाही. अमृताचे इन्स्टाग्रामवर 3.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.