आर्यन खाननंतर शाहरुखच्या लेकीची सर्वात जास्त चर्चा, ती पार्टी आणि आता तो फोटो...

त्याचे व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहेत.

Updated: Mar 1, 2022, 12:44 PM IST
 आर्यन खाननंतर शाहरुखच्या लेकीची सर्वात जास्त चर्चा, ती पार्टी आणि आता तो फोटो... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबतच त्याचं संपुर्ण कुटुंब सध्या खूपच चर्चेत आहे. आर्यन खानच्या ड्रग्ज केसमुळे शाहरुख खान सतत चर्चेत होता. 

आता या प्रकरणात आर्यन खानला दिलासा मिळाल्यानंतर तो बॉलिवूड पार्टींमध्ये बहिणीसोबत दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या पार्टीला त्याने बहिणीसोबत हजेरी लावली होती. पण आता आर्यन पेक्षा शाहरुखची लेक सुहाना खान सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे. 

सुहाना कधी तिच्या फोटोंमुळे तर कधी तिच्या पार्टीतील लूकमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. सुहाना नेहमीच बोल्ड अंदाजात दिसून येते. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या पार्टींमध्ये सुहाना आणि आर्यन एकत्र हजेरी लावत आहेत. त्याचे व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहेत.

आता सुहानाने पारंपारिक पेहरावात खास फोटोशूट केलं आहे. मनिष मल्होत्राच्या बँण्डचा लेहेंगा तिने परिधान केला आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमुळे सुहाना लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी देखील चर्चा सुरु झाली आहे. 

अनन्या पांडे ही सुहाना खानची जवळची मैत्रिण आहे. नेहमीच दोघी एकत्र वेळ घालवताना स्पॉट होतात. त्यामुळे मैत्रिण अनन्यानंतर आता सुहाना खान देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असं बोललं जात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समोर येत असलेल्या पार्टीतील व्हिडिओ आणि फोटोशूट यामुळे आर्यनपेक्षा आता सुहानाच सर्वाधिक चर्चेत आहे.