Hanuman : काही दिवसांपूर्वी आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनानं मोठा वाद सुरु झाला. अशात आता आणखी एक मोठी बातमी आली आहे. आता हनुमान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या या घोषणेनंतरही सोशल मीडियावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हनुमान या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. त्यांनी आधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ही 12 मे 2023 असल्याचे सांगितले होते. काही कारणांमुळे चित्रपटाचं शूटिंग, व्हिएफेक्स आणि सीसीजी हे सगळं पूर्ण झालं नाही आणि त्यासोबत दिग्दर्शक आणखी आउटपूट देत होते त्यामुळे त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर त्यांनी हा चित्रपट प्रेक्षकांचया भेटीला कधी येणार या विषयी सांगितले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची घोषणा करत प्रशांत वर्मा म्हणाले, माझ्या आयुष्यातील 2 वर्षे या चित्रपटासाठी दिली आहेत. पुढचे सहा महिने तुम्हाला सगळ्यात चांगल देण्यासाठी घालवणार आहे. 14 जानेवारी 2024 मकर संक्रांती निमित्तानं हनुमान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
I have spent 2 years of my life on this film and ready to spend another 6 months to give you nothing but the best! #HANUMAN on JAN 12th 2024, SANKRANTHI@tejasajja123 @Niran_Reddy @Primeshowtweets#HanuManForSankranthi pic.twitter.com/YkBBR8TPv0
— Prasanth Varma (@PrasanthVarma) July 1, 2023
पुढच्या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशीच महेश बााबूची 'गुंटूर करम' आणि रवि तेजाची 'ईगल' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे कलाकार गेल्या तीन वर्षांपासून सतत संक्रांतीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवत आहेत. हनुमान हा चित्रपट तेलुगु, हिंदी, मराठी, तमिल, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, स्पॅनिश, कोरियन, चीनी आणि जपानी भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.
प्रशांत वर्मा यांनी घोषणा केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, "11 भाषा ही फार मोठी गोष्ट आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "आशा आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करेल आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल." तिसरा नेटकरी म्हणाला, "चित्रपटाची प्रतिक्षा करत आहे."
हेही वाचा : "कास्टिंग काऊचचासाठी विचारताच सरळ मी...", अभिनेता Rajeev Khandelwal ला मोठा खुलासा
'हनुमान' अंजनाद्रीच्या काल्पनिक गावावर आधारित आहे. इतकंच नाही तर प्रशांत वर्मा यांच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला भाग आहे. चित्रपटात हनुमंथू, अमृता अय्यर, मीनाक्षी, सतीश कुमार आणि राज दीपक शेट्टी हे कलाकार आहेत.