ट्विंकल राहिली लांब... या अभिनेत्रींशीच खिलाडी कुमारचं नातं गाजलं

आता आनंदी आयुष्य जगणाऱ्या अक्षय कुमारचं 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं नावे  

Updated: Mar 31, 2022, 03:55 PM IST
ट्विंकल राहिली लांब... या अभिनेत्रींशीच खिलाडी कुमारचं नातं गाजलं  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकार त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अभिनेता अक्षय कुमार देखील त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्री ट्विकंल खन्नासोबत लग्न करण्याआधी अनेक अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध होते. पण लग्नानंतरही त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. अक्षयचे केवळ एक दोन अभिनेत्रींसोबत नाही तर तब्बल 8 अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध होते. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी
'धडकन' चित्रपटानंतर अक्षय आणि शिल्पाच्या नात्याचा अंत झाला. अक्षय एका वेळी शिल्पा शेट्टी आणि ट्विंकल खन्नाला डेट करत होता. शिल्पा आणि अक्षयच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली. आज देखील त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगत असतात. पण दोघे आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

अभिनेत्री रेखा
जेव्हा रेखा आणि अक्षयच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती झालं तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला. रिपोर्टनुसार 'खिलाडियो के खिलाडी' चित्रपटानंतर त्यांच्यात प्रेमाचा गुलाब फुलला. तेव्हा अक्षय रवीनाला डेट करत होता. 

अभिनेत्री रवीना टंडन 
अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमारच्या लग्नाच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. पण त्यांचं नात जास्त काळ टिकलं नाही. एका मुलाखतीदरम्यान तिने ब्रेकअपचं कारण सांगितलं, दोघांमध्ये सतत होणारी भांडणं आणि अक्षयचे अन्य अफेयरमुळे ते विभक्त झाले. महत्त्वाचं म्हणजे दोघांनी मंदिरात 2 वेळा साखरपुडा देखील केला. 

अभिनेत्री कतरिना कैफ
अभिनेत्री कतरिना कैफसोबत देखील अक्षयचं नाव जोडलं. 'सिंह इज किंग', 'वेलकम', 'नमस्ते लंदन'  या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. चित्रपटांनंतर त्याच्या नात्याची चर्चा देखील झाली. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. 

अभिनेत्री प्रियंका चोप्रा
कतरिनानंतर अक्षय आणि प्रियंकाच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगू लागली. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं.  पण दोघांनी यावर कबुली दिली नाही. महत्त्वाचं म्हणजे ट्विंकलने अक्षयला प्रियंकासोबत काम करण्यास मनाई केली होती.