गायक अदनान सामीला मातृशोक, फोटो शेअर करत चाहत्यांना केली प्रार्थना करण्याची विनंती

Adnan Sami Singer's Mother Death : अदनानी सामीच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत झाला भावूक

दिक्षा पाटील | Updated: Oct 7, 2024, 04:17 PM IST
गायक अदनान सामीला मातृशोक, फोटो शेअर करत चाहत्यांना केली प्रार्थना करण्याची विनंती title=
(Photo Credit : Social Media)

Adnan Sami Singer's Mother Death : पाकिस्तानी गायक अदनान सामी भारतात त्यांच्या चाहते असून त्यांच्या गाण्यांसाठी ते ओळखले जातात. नेहमीच सोशल मीडियावरून त्यांच्या कामाविषयी माहिती देणाऱ्या अदनान सामी यांनी यावेळी एक दु:खद बातमी शेअर केली आहे. अदनान सामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या आईचं निधन झाल्याची बातमी दिली आहे. त्यांच्या निधनाचं कारण काय हे अजून कळलेलं नाही. अदनान सामी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

अदनान सामी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आज सकाळी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या आईचं निधन झाल्याचं सांगितलं. या पोस्टमध्ये अदनान सामी यांनी त्यांच्या आईची जन्मतिथी आणि निधनाच्या तारखेसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं आहे की 'बेगम नौरीन सामी खान, 1947-2024'. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अदनान सामीनं हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की ही बातमी सांगताना खूप दु:खं होत आहे की माझी आई प्रिय बेगम नौरीन सामी खानचं निधन झालं आहे. आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्या एक महान महिला होत्या ज्यांनी सगळ्यांना प्रेम दिलं. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी प्रार्थना करा. अल्लाह माझ्या प्रेमळ आईला 

चाहत्यांनी अदनान सामी आणि त्याच्या कुटुंबासोबत या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. एका नेटकऱ्यानं सांगितलं की शांतीत आराम करा. देव तुम्हाला या सगळ्या दु:खातून बाहेर पडण्याची शक्ती देवो. दुसरा नेटकरी म्हणाला, तुमच्या आणि कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. तर हजारो लोकांनी कमेंट करत त्यांच्या आईच्या आत्म्याला शांती मिळो. 

हेही वाचा : बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, पण सर्वांचं लक्ष लेडी सिंघम दीपिकावरच!

दरम्यान, अदनान सामी यांच्या शेवटच्या गाण्याविषयी बोलायचं झालं तर 'भर दो झोली मेरी' हे गाणं होतं. हे गाणं 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटातील आहे. नऊ वर्षांच्या मुलाखतीनंतर त्याच्या चाहत्यांन पुन्हा एकदा त्यांचा आवाज ऐकण्याची संधी मिळणार आहे. 

पिंकव्हिलाच्या माहितीनुसार, अदनान सामी येणाऱ्या म्युजिकल हॉरर चित्रपट 'कसूर' मध्ये एक रोमॅन्टिक गाणं गाणार आहेत. तर त्यांची साथ देणार आहे गायिका पायल देव. तर या गाण्याला संगीतबद्ध जावेद मोहसिन यांनी केलं आहे. गाण्यात आफताब शिवदासानी, उर्वशी रौतेला आणि पंजाबी स्टार जस्सी गिल दिसणार आहेत.