Singham Again Trailer : बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, पण सर्वांचं लक्ष लेडी सिंघम दीपिकावरच!

Singham Again Official Trailer : 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...

दिक्षा पाटील | Updated: Oct 7, 2024, 02:13 PM IST
Singham Again Trailer : बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, पण सर्वांचं लक्ष लेडी सिंघम दीपिकावरच! title=
(Photo Credit : Social Media)

Singham Again Official Trailer : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या धमाकेदार ट्रेलरनं सगळ्यांची मने जिंकली आहे. या चित्रपटात कलाकारांची भट्टी जमली असं म्हणता येईल. तर ट्रेलरमध्ये त्या सगळ्या कलाकारांची झलकही पाहायला मिळाली आहे. 

रोहित शेट्टीच्या कॉप यूनिव्हर्स चित्रपटांच्या सीरिजमधला हा पाचवा चित्रपट आहे. यात ट्रेलरमध्ये 'सिंघम', 'सिंघम रिटर्न', 'सिंबा', 'सूर्यवंशी' या सगळ्या चित्रपटातील कलाकार एकत्र आल्यानंतर काय धम्माल होते हे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात रोहित शेट्टीनं ते काही सांगितल आहे ज्यासाठी तो ओळखला जातो. या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शनसोबत भक्ती, रामलीला आणि देशभक्ती असं सगळं काही पाहायला मिळणार आहे. सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे या बॉलिवूडच्या इतिहासातील सगळ्यात मोठा ट्रेलर आहे. या चित्रपटात 4: 58 मिनिटांचा हा ट्रेलर आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला अजय देवगनचा सीन दाखवण्यात आला आहे. जो त्याची पत्नी आणि मुलासोबत गप्पा मारत असतो आणि त्याच्या पत्नीला काही झालं तर तिला वाचवण्यासाठी तो काय काय करु शकतो याविषयी सांगताना दिसतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

करीना कपूर ही या चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर करीना ही रामलीला आयोजित करताना दिसते. करीना तिच्या रामलीलाच्या पुढच्या सीनविषयी अजय देवगणला सांगिताना दिसते तर मध्येच त्यांचा मुलगा चर्चा करताना दिसते. तर चित्रपटात अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ देखील दिसत आहेत. या सगळ्यांना या चित्रपटात पाहणं हे प्रेक्षकांसाठी कोणत्याही ट्रीट पेक्षा कमी नाही. 

हेही वाचा : पंकज त्रिपाठी यांचं खरं नाव माहितीये? लहाणपणीच स्वत: सोबत बदलली वडिलांचीही ओळख

दरम्यान, हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या हिट फ्रेंचायझीसोबत कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा 'भूल भुलैया 3' ची बॉक्स ऑफिसवर लढत असणार आहे. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानं प्रदर्शनाआधीच जवळपास 200 कोटींची कमाई केली आहे. असं म्हटलं जातं की अजय देवगण आणि रोहित शेट्टीसाठी सगळ्यात नॉन-थियेट्रिकल डील ठरणार आहे.