मुंबई : #MeToo प्रकरणामध्ये नाना आणि तनुश्रीच्या वादात राखी सावंतने उडी घेत तनुश्रीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. पण राखीच्या आरोपांचा तनुश्रीनं खरपूस समाचार घेतलाय. अमली पदार्थांचं सेवनचं काय तर धुम्रपान आणि मद्यपानही आपण करत नसल्याचं तनुश्रीनं सांगितलयं. तसंच आपण समलैंगिकही नसल्याचं सांगत, आपल्यावर निरर्थक बिनबुडाचे आरोप केले असून राखीचे हे नसते उपदव्याप असल्याचं तनुश्री दत्तानं म्हंटलंय. 'आपलं जाणीवपूर्वक चारित्र्यहनन करुन आपला आवाज बंद करण्याचा हा खोडसाळ प्रयत्न आहे. तो कदापी यशस्वी होणार नाही,' असा इशाराही तनुश्रीनं दिलायं.
'लैंगिक अत्याचाराविरोधातली ही चळवळ समाजाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवू आणू पाहत आहे. या गंभीर चळवळीला हास्यास्पद रुप दिलं जाऊ नये' असं आवाहनही तिनं केलं.
बुधवारी राखी सावंतने तनुश्री दत्ता विरोधात #SheToo चळवळ सुरू केलीयं. 'तनुश्री अनेकदा मला रेव पार्टीला घेऊन गेली, तिने अनेकदा ड्रग्स घेतले असून मला देखील जबरदस्तीने दिल्याचा' आरोप राखीने केलायं.
तनुश्रीने माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावण्याचा प्रयत्न केला नंतर गँगरेप करण्याची धमकी दिल्याचही राखीनं म्हटलं.
'तनुश्रीने माझ्यावर 10 करोड रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केलायं. आता मी तिच्यावर 50 करोड रुपयांचा दावा करतेयं' असं राखीने पत्रकारांना सांगितलं.