'अमलताश' सिनेमाचा टीझर

पाहा हा टीझर 

'अमलताश' सिनेमाचा टीझर  title=

मुंबई : शास्त्रीय गायक राहुल देशपांडे अभिनयात पदार्पण करत आहे. संगीताने भरलेल्या 'अमलताश' या सिनेमात आपल्याला राहुलचा अभिनय पाहायला मिळणार आहे. आता या सिनेमाचा टीझर लाँच झाला आहे. संगीत नाटकांप्रमाणेच राहुल देशपांडेने बालगंधर्व, पुष्पक विमान या दोन सिनेमात कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत. मात्र मुख्य भूमिकेत असा राहुल देशपांडे प्रथमच या सिनेमात झळकणार आहे. कलाकाराच्या आयुष्याभोवती फिरणारा हा सिनेमा असल्याचं कळतंय. 

 

राहुल देशपांडे 'अमलताश' हा त्याचा आगामी सिनेमा यंदा 'मामि' फिल्म फेस्टिवल्ससाठी निवडण्यात आल्याचं सांगितलं आहे. या सिनेमात राहुलसोबत त्याची बहीण दीप्ती माटेदेखील झळकणार आहे. या सिनेमाच्या पोस्टरमुळे उत्सुकता आणखी वाढत आहे.

आजच्या तरूणाईला शास्त्रीय संगीताकडे वळवण्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे गायक राहुल देशपांडेचा. शास्त्रीय गायनाच्या मैफीली, संगीत नाटकानंतर आता गायक राहुल देशपांडे सिनेमात पदार्पण करत आहे. संगीत नाटकाच्या माध्यमातून आपण राहुलच्या अभिनय अनुभवला आहे.