जवानांना श्रद्धांजली देताना श्रद्धा कपूरकडून झाली 'बिग मिस्टेक'

बॉलीवूड स्टार्सचे सोशल मीडियावर ट्रोल होणे सर्वसाधारण बाब झाली आहे. कधी छोट्या ड्रेससाठी, बोल्ड फोटोशूटसाठी अभिनेत्रींना नेहमी ट्रोल केले जाते.

Updated: Dec 19, 2017, 04:57 PM IST
जवानांना श्रद्धांजली देताना श्रद्धा कपूरकडून झाली 'बिग मिस्टेक' title=

मुंबई : बॉलीवूड स्टार्सचे सोशल मीडियावर ट्रोल होणे सर्वसाधारण बाब झाली आहे. कधी छोट्या ड्रेससाठी, बोल्ड फोटोशूटसाठी अभिनेत्रींना नेहमी ट्रोल केले जाते.

नुकताच अभिनेत्री श्रद्धा कपूरला अशा अनुभवातून जावे लागले. 

 पण यावेळी तिने कोणते बोल्ड फोटोशूट टाकले नव्हते. पण एक फेक फोटो शेअर करणे तिच्या समस्येच कारण ठरले आहे. 

 रविवारी या अभिनेत्रीने इंडियन आर्मीच्या जवानांना सलामी देण्यासाठी एक फोटे पोस्ट केला.

फोटोमध्ये दोन जवान ५० डिग्री थंड बर्फात दिसून येत आहेत. 

 चांगल्या उद्देशाने टाकल्या गेलेल्या या फोटोमूळे श्रद्धा कपूरला ट्रोल करण्यात आले आहे.

ट्विटर युजर्सच्या मते, फोटोतील हे भारतीय नसून रुसचे सैनिक आहेत.

काही यूजर्सचे असे म्हणणे आहे की हा फोटो २०१३ चा आहे.