स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील शंभू राजे आणि येसूबाई

झी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका चांगलीच लोकप्रिय आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 19, 2017, 08:59 PM IST
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील शंभू राजे आणि येसूबाई  title=

मुंबई : झी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका चांगलीच लोकप्रिय आहे.

आत्ता पर्यंत शिवाजी महाराजांवर अनेक मालिका आणि चित्रपटांची निर्मिती झाली आहे. परंतु संभाजी महाराजांवरील ही झी मराठीची पहिलीच निर्मिती आहे.  संभाजी महाराजांविषयी अनेक समाज गैरसमज आहेत त्याची खरी कहाणी काय आहे हेच या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न झी मराठीने केला आहे. या मालिकेतील संभाजी महाराजांचे आणि येसूबाईंचे बालपण हे अतिशय लोकप्रिय ठरले. या मालिकेत संभाजी महाराजांचे बालपण दिवेश मेदगे साकारत असून येसूबाईंची भूमिका आभा बोडस साकारत आहे. सध्या हे दोघ अतिशय लोकप्रिय झाले आहेत. या दोघांबद्दल जाणून घ्या थोडीशी माहिती....

 

दिवेश मेदगे - संभाजी महाराजांचे बालपण 

दिवेश मेदगे संभाजी महाराजांची बालपणीची भूमिका साकारत आहे. संभाजी महाराजांच बालपण कोण साकारणार हा प्रश्न समोर आला तेव्हाच दिवेश मेदगेचं नाव सुचवण्यात आलं. त्यानंतर त्याचा लूक टेस्ट करण्यात आला. त्याचे फोटोशूट झाले आणि मग त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. दिवेश मेदगे हा मुंबईतील भांडूप परिसरात राहणारा. नाहूर येथील शिवाई शाळेत दिवेश शिकतो. 

संभाजींच्या बालपणीच्या कॅरेक्टरसाठी दिवेश ढाल तलवार बाजी शिकला, गोफण फिरवायला येत असल्यामुळे दिवेशला त्याची मदत झाली. तसेच भाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 
जोर बैठका देखील मारायला दिवेश शिकला. पुणे जिल्हय़ातील राजगुरूनगर तालुक्यात असणारे दुर्गम भागातील कूड़े बुद्रुक हे गांव सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचत आहे. हया गावचे सुपुत्र कुमार “दिवेश पंढरीनाथ मेदगे” हे सध्या “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेतील बाल कलाकार संभाजीराजेंच्या भूमिका सादर करत आहे. 

आभा बोडस - येसूबाईंचे बालपण 

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत दिसणारी येसूबाई ची भूमिका करणारी चिमुरडी दुसरी कोणी नसून नकुशी म्हणजेच आभा बोडस आहे. तिची नकुशी ही मालिका आपण सर्वाना माहीतच आहे. आभा ही डोंबिवलीची असून ती सध्या सहाव्या इयत्तेत असून विद्यानिकेतन स्कूल डोंबिवली इथून शिक्षण घेत आहे. तिला शिक्षण बरोबर डान्स आणि acting ची फारच आवड आहे. 

तिच्या गोड़ हसण्यामुळे ती सर्वाची आवडती कलाकार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत तिची acting पाहण्याजोगी आहे. कडक आणि प्रेमळ या दोन्हीही भूमिका ती सहजपणे निभावताना पाहावयास मिळते. आभाने पेइंग घोस्ट या मराठी चित्रपटात ही काम केले आहे.