Shehnaaz Gill चा हात धरून चालणाऱ्या गायकाला पाहून चाहते हैराण; तुम्ही ओळखलं का त्याला?

शहनाज आणि सिद्धार्थ या दोघांच्या नात्यावर त्यांचे चाहते आजही भरभरून प्रेम करतात. 

Updated: Sep 15, 2022, 03:50 PM IST
 Shehnaaz Gill चा हात धरून चालणाऱ्या गायकाला पाहून चाहते हैराण; तुम्ही ओळखलं का त्याला? title=

Shehnaaz Gill Viral Video: शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या रिलेशनशिपमुळे प्रेक्षकांमध्ये ते दोघं चांगलेच चर्चेत होते त्याहूनही बीग बॉसमुळे (Shehnaaz Gill and Siddharth Shukla in Big Boss) त्यांची विशेष चर्चा होती. सिद्घार्थ शुक्लाच्या अचानक निधनामुळे शहनाजवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या महिन्यात सिद्धार्थ जाऊन एक वर्ष झालं आहे. आजही त्याच्या आठवणींनी शहनाज हळवी होते. शहनाज आणि सिद्धार्थ या दोघांच्या नात्यावर त्यांचे चाहते आजही भरभरून प्रेम करतात. (actress shehnaaz gill spotted with singer jasdeep singh gill at a birthday party event video goes viral)

सध्या शहनाज आपलं लाईफ एन्जॉ़य करताना दिसते आहे. नुकताच शहनाजचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती जसदीप सिंग गिल (Jasdeep Singh Gill) या गायकाबरोबर हातात हात घेऊन चालताना दिसते आहे. शहनाज सिद्धार्थ निगमच्या बर्थडे पार्टीमधून बाहेर पडताना स्पॉट झाली. तेव्हा ती जसदीप सिंगसोबत दिसली. यावेळी चक्क ती फोटोग्राफर्सनाही दुर्लक्षित करत होती. 

व्हिडिओमध्ये शहनाज निळ्या रंगाचा डेनिम परिधान करताना दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. त्याचबरोबर जस्सी गिल हिरवा शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली असल्याचं व्हिडीओच्या कमेंट्सवरून समजते. जस्सी आणि शहनाज एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता शहनाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते व्हिडिओवर कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसणार आहे.