बिल्डरचा प्रसिद्ध अभिनेत्रीवर बलात्कार, त्यानंतरही नराधम थांबला नाही....

कोणावर विश्वास ठेवावा की नाही? बिल्डरचा अभिनेत्रीवर फक्त  बलात्कार नाही तर, आई - वडिलांना देखील...   

Updated: Sep 14, 2022, 09:20 AM IST
बिल्डरचा प्रसिद्ध अभिनेत्रीवर बलात्कार, त्यानंतरही नराधम थांबला नाही.... title=

मुंबई : झगमगत्या विश्वातील कायम एक काळी बाजू समोर येत असते. आता देखील असच काही घडलं आहे. एका बिल्डरने अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य अजय कपूर याने 24 वर्षीय अभिनेत्रीवर बलात्कार केला आहे. अभिनेत्रीने काही तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. 

आरोपी आणि पीडितेने एकमेकांसोबत मोबाईल नंबर शेअर केला. त्यानंतर दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दिवसागणिक त्यांचं नातं अधिक घट्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

'आदित्य अजय कपूरने लग्नाचे आश्वासन देऊन महिलेशी शारीरिक संबंध ठेवले होते.' कपूरने कफ परेड भागात आणि गोव्यातील राहत्या घरी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. 

एवढंच नाही तर, जेव्हा अभिनेत्रीने लग्नाची मागणी केल्यानंतर बिल्डरने पीडितेला  शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जेव्हा पीडितेन शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा आरोपीने तिला मारहाण केली.'

शिवाय पीडित अभिनेत्रीच्या आई-वडिलांना देखील अश्लील मेसेज पाठवले. कपूरला बलात्कार आणि आयटी कायद्यासह आयपीसीच्या विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.