प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मात्र यावेळी प्राजक्ताने सोशल मीडियावर चक्क फोन नंबर शेअर केला आहे.

Updated: Feb 1, 2024, 01:33 PM IST
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर title=

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशलम मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ता माळी ही एक अशा अभिनेत्रीपैकी एक आहे जी सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर एखादी जरी पोस्ट शेअर केली तर ती लगेच व्हायरल होवू लागते. अनेकदा अभिनेत्रीच्या लग्नाचाही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नेहमीच चर्चेत असणारी प्राजक्ता यावेळी मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने अशी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत काही ना काही शेअर करते. कधी ती तिचे ग्लॅमरस फोटोशूट शेअर करते तर कधी तिच्या फार्महाऊसचे फोटो शेअर करते. तर कधी ती तिचे व्हीडिओ शेअर करते. तर कधी तिच्या व्यवसायाचं प्रमोशन करताना दिसते. प्राजक्ता माळी एक बिझनेस वुमनदेखील आहे. प्राजक्त राज या नावाचा तिचा दागिन्यांचा ब्रँण्ड आहे. अभिनयासोबतच प्राजक्ता एक उत्तम बिझनेस वुमन आहे. सोशल मीडियावर ती कायमच प्राजक्त राजचे व्हिडीओ शेअर करत असते. अनेकांनी तिच्या या बिझनेसला अवघ्या काही वेळातच भरभरुन प्रेम दिलं आहे. मात्र प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक अशी पोस्ट शेअर केली आहे ज्याने तिचे आश्चर्यचकित होत आहेत. नुकतीच प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या स्टोरीवर प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हीडिओसोबत एक फोन नंबर शेअर केला आहे. खरंतर या व्हिडीओमध्ये प्राजक्ता श्लोक पठण स्पर्धेबद्दल बोलताना दिसत आहे. याचबरोबर तिने एक फोन नंबरही शेअर केला आहे आणि तिने तिच्या चाहत्यांना अवाहन केलं आहे की, ज्या कुणाला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी दिलेल्या या नंबरवर कॉल करावा. तिची ही पोस्ट अवघ्या काही वेळातच व्हायरल होत आहे. या सगळ्यावरुन हे स्पष्ट होतं की, प्राजक्ताने शेअर केलेला नंबर हा तिचा नसून ज्यांनी स्पर्धा आयोजित केली आहे त्यांचा हा फोन नंबर आहे. 'हास्यजत्रा' या कार्यक्रमात प्राजक्ता सुत्रसंचालन करताना दिसते. तर प्राजक्ता लवकरच अनेक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.