मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये पूराने थैमान घातलं आहे. या पूरात अनेकांचे संसार उद्धस्त झाले आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना अनेक ठिकाणहून मदत करण्यात येत आहे. अभिनेता सुबोध भावेने 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाच्या प्रयोगाची रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचं सांगितलं आहे.
१५ ऑगस्ट रोजी बोरीवलीत प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगाचे उत्पन्न कोल्हापूर, सांगलीमधील पुरात अडकलेल्या लोकांना मदत म्हणून देण्यात येणार असल्याचं सुबोधने जाहीर केल आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता अनेक संस्थाही पुढाकार घेत आहेत. श्री सिध्दिविनायक न्यासातर्फे कोल्हापूर, सांगली आदी पूरग्रस्त लोकांना शुध्द पिण्याचे पाणी पाठवण्यात येणार आहे. याठिकाणी ट्रकमधून पाणी पाठवण्यात येणार असल्याचं, श्री सिध्दिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितल आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानेही पुरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केलं आहे.