एकांतात बसलेल्या सिद्धार्थ जाधवची इमोशनल पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली

अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असतो. नुकताच सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

Updated: Aug 1, 2023, 06:34 PM IST
एकांतात बसलेल्या सिद्धार्थ जाधवची इमोशनल पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आहे. नुकताच सिद्धार्थ त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी परदेशात गेला आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थ नेहमी सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमी त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. 

नुकताच सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे त्याने पोस्टला दिलेलं कॅप्शन. फोटो शेअर करत त्याने या पोस्टला कॅप्शन दिलं आहे की, ''कितीदा नव्याने तुला आठवावे.... '' याचबरोबर त्याने या पोस्टसोबत त्याने हार्ट ईमोजीही शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या या पोस्टवर युजर्सने कमेंट्स बॉक्समध्ये युजर्सने कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलंय की, ''सिद्धूदादा, खिडकीच्या बाहेर बघतानाचा फोटो काढायला हवा होता. ह्या गाण्याला जास्त शोभला असता. फोटो काढणारा गांडला जरा''. तर अजून एकाने '' इमोशनल झाला तू तर भावा'' तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, कोणाला आठवतोय नाही सांगणार का? तर अनेकांनी त्याच्या या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केले आहेत. तर अनेकांनी मात्र त्याला ट्रोल केलं आहे. 

गेल्या काही दिवसांपुर्वी सिद्धार्थ त्याच्य पर्सनल आयुष्यामुळे खूप चर्चेत होता. त्याच्या वैवाहिक आयुष्यात काही ठिक नसल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. त्याने घटस्फोट घेतल्याचा बातम्या सोशल मीडियावर चर्चेत होत्या. सिद्धार्थ जाधव आणि पत्नी तृप्ती जाधव यांच्यात काहितरी बिनसलयं अशा बातम्या काही दिवसांपुर्वी वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या.  गेल्या काही दिवसांपासून ते एकत्रही राहत नाहीयेत. त्याच्या दोन मुली त्याच्या पत्नीसोबत राहत आहेत. दोघांमधलं वादाचं कारण मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. 

अनेकदा सिद्धार्थ त्याच्या मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अनेकदा तो त्याचा वेळ त्याच्या मुलींसोबत घालवताना दिसतो. सध्या सिद्धार्थ त्याचा आगामी सिनेमा 'सुस्साट' सिनेमाच्या शूटिंगसाठी बाहेरच्या देशात आहे. 

नुकताच सिद्धार्थ जाधवचा 'अफलातून' या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ एका आंधळ्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. 'श्री' असं त्याच्या पात्राचं नाव आहे. लवकरच अभिनेत्याचे अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.