अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच अडकणार दुसऱ्यांदा लग्नबंधनात?

श्रेयस तळपदे प्रोफेशनल आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही बराच चर्चेत असतो.

Updated: May 25, 2022, 06:01 PM IST
अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच अडकणार दुसऱ्यांदा लग्नबंधनात? title=

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेने छोट्या पडद्यावर कमबॅक करत झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ यामध्ये दिसला आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे खूप वर्षांनंतर मालिकांमध्ये झळकला आहे. श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहे. या जोडीने पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. छोट्या पडद्यावर या नव्या जोडीला प्रेक्षक प्रचंड पसंती देतात यात काहीच शंका नाही. 

श्रेयस तळपदे या अगोदर 'झी युवा'वरील 'गुलमोहर' मालिकेत दिसला होता. यावेळी त्याने गिरीजा ओकसोबत स्क्रिन शेअर केली होती. त्याआधी श्रेयसची 'अवंतिका' ही झी मराठीवरील मालिका अतिशय लोकप्रिय ठरली. तसेच बॉलिवूडमध्ये देखील श्रेयसने स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं. 'इक्बाल' हा श्रेयसचा पहिला बॉलिवूड सिनेमा. त्यानंतर रोहित शेट्टीच्या सिनेमात श्रेयसने धम्माल केली आहे. 
 
श्रेयस तळपदे प्रोफेशनल आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही बराच चर्चेत असतो. 2004 मध्ये श्रेयस तळपदे आणि दीप्ती सोबत लग्नगाठ बांधली.  लग्नाच्या 14 वर्षानंतर, 4 मे 2018 रोजी श्रेयस आणि दीप्ती सरोगसीच्या मदतीने मुलगी आद्याचे पालक बनले. अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदे देखील तिच्या लुकसाठी प्रसिद्ध आहे. ती अनेकदा पार्टी, इव्हेंट्समध्ये अभिनेत्यासह स्पॉट झाली आहे. याशिवाय श्रेयस अनेकदा त्याच्या लव्हिंग वाइफसह इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असतो.

मात्र आता चर्चा रंगतेय ती म्हणजे श्रेयस तळपदेच्या दुसऱ्या लग्नाची. आता तुम्ही म्हणाल या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागलीये. तर आम्ही तुम्हाला सांगतो. श्रेयस त्याच्या रिअल लाईफमध्ये खूप खुश आहे. श्रेयसचं हे लग्न खरंखुर नसून तो यावेळी मालिकेत लग्नबंधनात अडकताना दिसणार आहे. लवकर झी  मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत मोठं वळण येणार आहे. यामध्ये लवकरच त्यांच्या लग्नाचे एपिसोड्स प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतात. त्यामुळे श्रेयसच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा खऱ्या आयुष्यातली नसून माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतली आहेत. लवकरच मालिकेत यश आणि नेहा कामत लग्नबंधनात अडकणार आहेत.