बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या Esha Gupta चे रोमँन्टिक फोटो व्हायरल

ईशा गुप्ता सध्या तिच्या आगामी 'आश्रम 3' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. 

Updated: May 25, 2022, 04:34 PM IST
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या Esha Gupta चे रोमँन्टिक फोटो व्हायरल title=

मुंबई : ईशा गुप्ता सध्या तिच्या आगामी 'आश्रम 3' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देणारी अभिनेत्री ईशा सध्या तिचा बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पोस गुलरसोबत फिरायला गेली आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या रोड ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. जे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

मनामामध्ये दिसले एकत्र 
ईशा गुप्ता तिच्या बॉयफ्रेंडसोबत बहरीनमधील मनामा शहराला भेट देण्यासाठी गेली आहे. जिथून अभिनेत्रीने व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, अभिनेत्री जांभळ्या रंगाच्या ट्राउझर्ससह पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिचे केस मोकळे सोडले आहेत. त्याचबरोबर तिने अगदी हलका मेकअप केला आहे.  

बॉयफ्रेंडसोबत काढला फोटो
ईशा गुप्ताने सोशल मीडियावर केवळ या ट्रिपचे व्हिडिओ शेअर केले नाहीत तर बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ईशा गुप्ता बॉयफ्रेंडसोबत आराम करताना दिसत आहे. यासोबतच फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वत: शेअर केला व्हिडिओ
पनामा सिटीचे हे फोटो आणि व्हिडिओ स्वत: ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं की,  'वन डे इन पनामा.'