ब्लॉकबस्टर शब्दाचा अर्थ बदलणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सोशल मीडियावर चित्रपटाच्या पोस्टरचा धुमाकूळ 

Updated: Jan 31, 2020, 03:17 PM IST
ब्लॉकबस्टर शब्दाचा अर्थ बदलणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : चित्रपट साकारताना त्याचं भविष्य ठरवलं जात नाही, कारण हे सारंकाही प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असतं असं म्हणतात. पण, काही चित्रपट मात्र त्याचं यश हे प्रदर्शित होण्यापूर्वीच मिळवू लागलेले असतात. सध्या अशाच साचातील एक चित्रपट सोशल मीडिया आणि बहुभाषिय चित्रपट वर्तुळांमध्ये चर्चांचा विषय ठरत आहे. 

दिग्दर्शक लोकेश कनगराजच्या या चित्रटाचं नाव आहे, मास्टर. मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्यामध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नुकतच या चित्रपटाचं तिसरं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. ज्यावर Bigil फेम अभिनेता विजय जोसेफ आणि 'सुपर डिलक्स' फेम अभिनेता विजय सेतुपती दिसत आहेत. 

'मास्टर'च्या निमित्ताने पहिल्यांदाज दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील दोन मोठी नावं, म्हणजेच विजय सेतुपती आणि विजय जोसेफ एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरील कलाकारांचा लूक पाहून, मास्टरच्या यशाची भाकितं आतापासूनच सांगण्यात येत आहे. प्रेक्षकांमध्ये तर, या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

दाक्षिणात्य चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये वाढती लोकप्रियता या चित्रपटाला फायद्याची ठरणार आहे. त्यातही दोन्ही अभिनेत्यांचा निर्धारित प्रेक्षकवर्गही चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये हातभार लावणार आहे. त्यामुळे 'मास्टर' प्रदर्शित झाल्यानंतर ब्लॉकबस्टर या शब्दाचीच परिभाषा बदलू शकतो, असं काही चाहत्यांचं आणि जाणकारांचं म्हणणं आहे.