'हा पाहा देव'; फुलांचा वर्षाव अन्... लिटिल चॅम्प्सचे प्रेम पाहून अशोक मामा भावूक

Ashok Saraf Emotional : अभिनेते अशोक सराफ आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहे. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. यावेळी ते प्रचंड इमोशनल झाले आहेत. पाहूया नक्की काय घडलं?

गायत्री हसबनीस | Updated: Sep 13, 2023, 05:22 PM IST
'हा पाहा देव'; फुलांचा वर्षाव अन्... लिटिल चॅम्प्सचे प्रेम पाहून अशोक मामा भावूक title=
actor ashok saraf gets emotional after the heart warming welcome did by little champs

Ashok Saraf Emotional : अशोक सराफ हे अभिनयातले देव आहेत. त्यांचे आजपर्यंत कौतुक होताना दिसते. त्यांच्याकडे पाहून असंच म्हणावेस वाटते न भूतो न भविष्यति! असा नट होणे नाही. सध्या त्यांच्यावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. यावेळी चक्क बालकलाकारांनाही त्यांचे आशीर्वाद घेण्याचा मोह आवरला नाही. 'झी मराठी' वाहिनीवर 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे नवीन पर्व सुरू झाले आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. यावेळी या शोमध्ये चक्क ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफांनी हजेरी लावली होती. त्यामुळे यावेळी लिटिल चॅम्प्सनं त्यांचे जे स्वागत केले ते पाहून चक्क अशोक सराफ हे प्रचंड भावूक झाले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे नेटकरीही त्यांचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होताना दिसते आहे. 

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की अशोक सराफ यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे. त्याचसोबत लिटिल चॅम्प्स हे स्वत:च्या हातानं चक्क त्यांचे पाय दुधानं दुधाताना दिसत आहेत व सोबतच त्यांचे आशीर्वादही घेताना दिसत आहेत. यावेळी नेटकरी हे या व्हिडीओखाली नानाविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युझरनं लिहिलंय की, 'खूप चांगल उदाहरण आहे.....म्हणतात ना इथेच कर्याच आणि इथेच भोगायचे...हे फक्त वाईट हेतूने न घेता चांगल्या हेतूने पण घेता येत ते मामांनी दाखवलं....म्हणजेच काय त्यांनी आता पर्यंत प्रामाणिक पणे केल्या कमची पावती आज या स्वरुपात मिळता आहे...ग्रेट मामा'

तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, माहित नाही क्या जादू आहे या वक्ती मध्ये, यांना बगूनच मनात एक स्मित हास्य येत, धन्य आहे आम्ही की सम्राट, विनोदाचे बादशहा माझे लहानपणापासून चे सगळयात आवडते अभिनेते अशोक शराफ (मामा ) या महाराष्ट्रात जलमले. वी लव्ह यऊ सर' 

तिसऱ्या एकानं लिहिलंय की, 'हा विठ्ठल आहे मराठी इंडस्ट्री मधील तो विटेवरी उभा आणि हा कलेवर... मी अशोक सराफ ला आरेतुरे करतोय तो देवासमान आहे.. माझा गणपती माझा विठ्ठल तसा तो सिनेसृष्टीचा देव आहे त्याला मी आरे तुरे करणार माझी भाबडी कलेची श्रद्धा आहे त्यावर.. ह्या माणसाने धनंजय माने बनवुन हसवल. फाल्गुन वडक झाला कधी लुकतुके बनवुन हसुन पोट दुखवल तर कधी आपली माणसे चौकट राजा मधील गणा करुन पोटात गोळा आणि डोळ्यात अश्रू.. वाट पहाते पुनवेची मधील भैय्यासाहेब वा संसार संसार मधील सावकार बनवुन डोळ्यात राग आंनला...अशा नानाविध कमेंट्स त्यांनी दिलेल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या पर्वात परीक्षकाची भूमिका गायक, संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे सांभाळत आहेत. तर या संपूर्ण गुरुकुलची जबाबदारी सुरेश वाडकर यांच्यावर आहे.