मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं आपल्या कुटुंबातील खास सदस्य गमावला आहे. त्याने फोटो शेअर करत याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. सिद्धार्थ खूप जास्त भावुक झाला होता. सिद्धार्थने या सदस्यासोबतच्या काही खास आठवणी सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
कुटुंबातील हा सदस्य अतिशय प्रेमळ आणि जणू काळजाचा तुकडाच होता. सिद्धार्थ खूप जास्त या पोस्टमधून भावुक झाल्याचं दिसत आहे. सिद्धार्थचा खास मित्र त्याचा कुत्रा ऑस्करसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने यावेळी काही खास आठवणींना उजाळा दिला.
ऑस्करच्या अचानक जाण्याने सिद्धार्थच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे. माझा ऑस्कर आता या जगात राहिला नाही. तो आमच्या कुटुंबातील एक खास सदस्य झाला होता. खूप रितं झाल्यासारखं वाटत आहे. त्याची उणीव कायम आम्हाला भासणार आहे. त्याच्याकडूनही काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीजवळ असलेल्या कुत्र्याचं निधन झालं होतं. तिने देखील भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता सिद्धार्थ मल्होत्रानं आपल्या मित्राच्या निधनाची दु:खद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.