नवी दिल्ली : 'पद्मावती'नंतर दीपिका पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपटात दिसू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या हातात भन्साळीचा अजून एक चित्रपट आहे, असे म्हटले जात आहे. यापूर्वी दीपिकाने भन्साळींसोबत 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावती' या चित्रपटात काम केले आहे.
या चित्रपटात दीपिकासोबत अभिषेक बच्चन झळकणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी या चित्रपटात प्रियंका चोप्रा काम करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र भन्साळींनी अमृता प्रीतम या व्यक्तिरेखेसाठी दीपिकाचे नाव फायनल केले आहे. भन्साळींच्या या आगामी चित्रपट हा साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची प्रेमकथा असणार आहे.
बॉलीवुडलाइफ.कॉमच्या वृत्तानुसार, भन्साळींच्या चित्रपटातील भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी अभिषेक बच्चनने आतापासूनच तयारी सुरु केली आहे.