आता तुम्हीही बनू शकता 'बाहुबली'

यंदाच्या वर्षातील सर्वात हीट सिनेमा ठरला तो म्हणजे 'बाहुबली' 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 4, 2017, 08:28 PM IST
आता तुम्हीही बनू शकता 'बाहुबली'  title=
File Photo

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षातील सर्वात हीट सिनेमा ठरला तो म्हणजे 'बाहुबली'. या सिनेमातील अभिनेता प्रभास याच्यासोबतच इतर अभिनेत्यांच्या भूमिकाही सर्वच प्रेक्षकांना आवडली. इतकेच नाही तर सिनेमासाठी तयार करण्यात आलेल्या भव्यदिव्य सेट ही प्रेक्षकांना खूप आवडला.

माहिष्मती साम्राज्य नागरिकांना खूपच आवडलं, हे साम्राज्य प्रत्येकाला पहावसं वाटतं होतं. तुम्हालाही हा भव्यदिव्य सेट पाहण्याची संधी, बाहुबली किंवा कटप्पाच्या जवळ जाण्याची इच्छा आहे? तर मग काळजी करु नका कारण आता तुमची ही इच्छा पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये जवळपास १०० एकर परिसरात तयार करण्यात आलेला हा भव्यदिव्य सेट सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर नागरिकांनी हा सेट पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.

जवळपास ६० कोटी रुपये खर्च करुन या जागेत सर्व वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. या वस्तुंचा सिनेमा निर्माण करण्यासाठी वापर करण्यात आला होता. यामुळे सर्वसामान्य नागरिक रिल लाईफचा सीन रिअल लाईफमध्ये अनुभवत आहेत.

मात्र, हा सेट पाहण्यासाठी तुम्हाला थोडे पैसे खर्च करावे लागणार आहेत. तिकीट दोन स्वरुपात आहेत. साधारण तिकीट १२५० रुपयांमध्ये आणि प्रिमिअम तिकीट २३४९ रुपयांचं आहे.

रिपोर्ट्सनुसार, १०० एकर परिसरात बनवण्यात आलेल्या सिनेमाच्या सेटसाठी ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले. शूटिंग संपल्यानंतर हा सेट तसाच ठेवण्यात आला आहे. 'बाहुबली'चं साम्राज्याचं डिझाईन अवॉर्ड विनर प्रोडक्शन, डिझायनर साबू सिरिल आणि त्यांच्या टीमने तयार केलं आहे.