अक्षयसाठी आमिर खानने दिले सलमान, शाहरूख आणि बीग बींना चॅलेन्ज

चित्रपटाची रिलिज डेट, बॉक्सऑफिस कलेक्शन यावरून अनेकदा बॉलिवूड कलाकारांमध्ये कोल्ड वॉर सुरू असते. पण आजकाल ट्विटरवर बॉलिवूडस्टार्स एक नव्या चॅलेंजमध्ये रंगले आहेत. 

Updated: Feb 2, 2018, 06:40 PM IST
अक्षयसाठी  आमिर खानने दिले सलमान, शाहरूख आणि बीग बींना चॅलेन्ज  title=

मुंबई : चित्रपटाची रिलिज डेट, बॉक्सऑफिस कलेक्शन यावरून अनेकदा बॉलिवूड कलाकारांमध्ये कोल्ड वॉर सुरू असते. पण आजकाल ट्विटरवर बॉलिवूडस्टार्स एक नव्या चॅलेंजमध्ये रंगले आहेत. 

पॅडमॅन चॅलेंज 

अक्षय कुमारचा बहुचर्चित 'पॅडमॅन' हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रिलिज होण्याआधीच ट्विकंल खन्नाने काही बॉलिवूड स्टार्सना पॅडमॅन चॅलेंज दिले आहे. 

 

काय आहे चॅलेंज ? 

हातामध्ये सॅनिटरी पॅड पकडून फोटो क्लिक करायचा आहे. हा फोटो ट्विटर पोस्ट करून मित्रांना टॅग करून त्यांना हे चॅलेन्ज पास करायचे आहे.  

भारताप्रमाणे जगभरात सॅनिटरी पॅडबाबत समाजात अनेक समज गैरसमज आहेत. हे समज दूर करण्यासाठी, मासिकपाळीच्या काळात स्त्रियांनी स्वच्छता राखणं गरजेचे आहे. मासिकपाळी आणि या दिवसातील स्व्च्छता याविषयावर 'पॅडमॅन' या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. 

सलमान खान , शाहरूखला चॅलेंज 

 

ट्विंकल खन्नाने आमिर खानला दिलेलं चॅलेंज त्याने पूर्ण केले आहे. आता आमिर खानने हे चॅलेन्ज अभिनेता सलमान खान, शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन यांना चॅलेन्ज दिले आहे.