नवी दिल्ली : पद्मावतच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने नव्या जाहिर झालेल्या बजेटवर आपली प्रतिक्रिया दिली. बजेटमध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी, मध्यम वर्गींयासाठी आणि महिलांसाठी जो काही खर्च करणार आहे त्यातून आर्थिक उन्नतीचे संकेत मिळत आहेत.
शाहीद कपूरने सांगितले की, मी एक अभिनेता असल्याने माझे उत्पन्न स्टेबल नाहीये. माझ्या कामानुसार ते कमी अधिक होत असते.
शाहिदने सांगितले की, त्याने आयुष्यातील पहिली कमाई वयाच्या १२ व्या वर्षी केली होती. तेव्हा तो एका टेलिव्हीजन मालिकेत काम करत होता. त्याच दरम्यान त्याने काही जाहिरातींमध्येही काम केले. त्याचबरोबर तो पुढे म्हणाला की, लहानपणी त्याला २० रुपये पॉकेटमनी मिळत होता. त्या पैशात मी वडापाव खायचो आणि शाळेत चालत जाण्याऐवजी ऑटोने जात असे.
सरकारचे बजेट हे महिलांच्या प्रगतीसाठी आहे, हा अत्यंत स्मार्ट निर्णय आहे. महिलांमध्ये परिवर्तनाची शक्ती असते. त्यामुळे त्यांच्यावर बंधने न घालता प्रोत्साहन द्यावे.तसंच भारतीय अर्थव्यवस्था खूप जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे इथे गुंतवणूकीसाठी खूप संधी आहेत.
अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शाहीद आपल्यासोबत कधी कॅश ठेवत नाही. जवळपासच्या लोकांकडून उधार घेऊन काम चालवून नेतो. अनेकदा तो स्वतःचे क्रेडीट कार्ड वापरण्याऐवजी बायकोचे म्हणजे मिराचे क्रेडीट कार्ड वापरतो. त्यावरून वाद झाल्यास मी पैशांशी डिल करत नाही, असे तो सांगतो. त्याचबरोबर तो म्हणाला की, पैसे नीट इंवेस्ट करणे गरजेचे आहे. मात्र मला पैसे सांभाळता येत नाहीत. त्यासाठी मी माझ्या मॅनेजर किंवा सीएची मदत घेतो. पुढे तो म्हणाला की, मीच नाही तर माझे संपूर्ण कुटुंब क्रिएटिव्ह असून आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत कच्चे आहोत.