मुंबई : प्रेक्षक नेहमीच बॉलीवूडशी संबंधित चित्रपटांच्या इनसाईट स्टोरी ऐकण्यास उत्सुक असतात. असाच एक किस्सा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत घडला आहे. आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट का म्हटले जाते याचंच हे एक उदाहरण ठरलं आहे.
त्याच्या कामात प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी असे त्याला वाटते. अशा परिस्थितीत तो प्रत्येक गोष्टीसाठी विशेष मेहनत घेतो, कोणत्याही भूमिकेत आपलं पात्र दमदार रित्या पाठवण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो.
बॉलीवूड अभिनेता आमिर खानशी संबंधित असाच एक किस्सा समोर आला आहे. आमिर खानने त्याच्या गुलाम चित्रपटासाठी 10 ते 12 दिवस अंघोळ न करण्याचा निर्णय घेतला होता.
खरं तर या चित्रपटातील एक सीन पूर्णपणे परफेक्ट करायचा होता. क्लायमॅक्सच्या एका सीनमध्ये खलनायक आमिरला खूप मारतो, अशा परिस्थितीत या सीनच्या शूटिंगदरम्यान आमिरच्या चेहऱ्यावर खूप घाण जमा होते.
पण त्या दिवशी हा सीन पूर्ण शूट करता आला नाही. त्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट त्याच लूकमध्ये राहण्यासाठी एक निर्णय घेतो.
आमिर खानचा हा क्लायमॅक्स सीन पूर्ण शूट होऊ शकला नाही, तेव्हा त्याला भीती वाटत होती की, आता हा मेकअप काढला, ही घाण आता काढली, तर तो लूक पुन्हा तसाच दिसणार नाही.
अशा परिस्थितीत क्लायमॅक्सचा सीन परफेक्ट पद्धतीने शूट करण्यासाठी आमिरने 10 ते 12 दिवस अंघोळ न करण्याचं ठरवलं.