हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बिल बघताच अभिनेत्याने का केला राडा? व्हिडिओ व्हायरल

अभिनेता हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेतो.

Updated: Mar 13, 2022, 01:37 PM IST
 हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बिल बघताच अभिनेत्याने का केला राडा? व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत बराच वेळ घालवतो. कुणाल आणि सोहाची बाँडिंग सगळ्यांनाच आवडते. सोहा आणि कुणाल दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि दररोज काहीतरी शेअर करत असतात.

सध्या कुणाल सोहा आणि मुलगी इनायासोबत दुबईत सुट्टी एन्जॉय करत आहे. सोहाने सोशल मीडियावर मित्रांसोबत डिनरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कुणाल बिल भरण्यासाठी त्याच्या मैत्रिणीसोबत भांडताना दिसत आहे.

कुणालचा हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण स्वतःला त्याच्यासोबत रिलेट करू शकत आहेत. अभिनेता हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेतो.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण जेव्हा बिल भरण्याची वेळ येते तेव्हा तो मैत्रिणीला बिल भरण्यासाठी सांगताना दिसत आहे. सर्व बिल मी भरेन असं तो बोलताना दिसत आहे.

दोघांमध्ये बिल भरण्यावरुन भांडण असं सुरु झालं की दोघेही ऐकायला तयार नव्हते.व्हिडिओमध्ये कुणाल त्यांची मैत्रिण सिमोन खंबाटासोबत बिल भरण्यासाठी भांडत आहे.