'माझ्यात काय कमी होती...' घटस्फोटानंतर आमिर खानचा किरण रावबाबात मोठा खुलासा

 आमिर आणि किरण राव हे बॉलिवूडचं लाडकं कपल होतं.  मात्र यादोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. आमिर आणि किरण 2021 मध्ये वेगळे झाले. पहिल्यांदा त्याच्या घटस्फोटावर आमिर व्यक्त झाला आहे.

Updated: Feb 25, 2024, 03:39 PM IST
'माझ्यात काय कमी होती...' घटस्फोटानंतर आमिर खानचा किरण रावबाबात मोठा खुलासा title=

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण रावने काही वर्षापुर्वी घटस्फोट घेतला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. आमिर खानने किरण रावसोबत दुसरं लग्न केलं होते. किरण रावाधी रिना दत्तासोबत त्याने लग्नगाठ बांधली होती. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर आमिरने रिनासोबत घटस्फोट घेतला. यानंतर अभिनेत्याने किरण रावसोबत लग्न केलं होतं मात्र यादोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. आमिर आणि किरण 2021 मध्ये वेगळे झाले. दोघांनी एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेतला. मात्र दोघांच्या घटस्फोटानंतर दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. घटस्फोटानंतर दोघांनी 'लपता लेडीज' या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र नुकतंच आमिरने त्याच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत किरणला पती म्हणून काय कमी आहे असे विचारलं होतं. 

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिर खानने त्याच्या घटस्फोटावर उघडपणे भाष्य केलं. याविषयी बोलताना अभिनेता म्हणाला, 'मजेची गोष्ट आहे. आमचा घटस्फोट नुकताच झाला. तुम्हा सर्वांना माहितीच आहे. एके दिवशी संध्याकाळी मी  बसलो होतो, मी किरणला विचारलं की, एक पती म्हणून माझ्यात काय कमतरता आहे? मी सध्या माझ्या आयुष्यात काय सुधारणा करू? 'यानंतर अभिनेत्याने पत्नीने काय उत्तर दिलं हे सांगितलं.  आणि म्हणाला, 'होय, लिही, खरं तर तिने मला काही मुद्दे लिहायला सांगितले होते. तू खूप बोलतोस. तु कोणाला बोलू देत नाही, तु तुझ्याच मुद्द्यावर खूप बोलत राहतोस. त्यापैकी मी  काही 15-20 मुद्दे लिहिले आहेत.'

याचशिवाय नुकतंच जेव्हा आमिर खानसोबत बोलताना विचारलं गेलं की, घटस्फोटानंतर तो किरणसोबत कसं काम करत आहे? या प्रश्नावर आमिरने खूप शानदार पद्धतीने उत्तर दिलं होतं. या प्रश्नावर गंमतिशीर पद्धतीने उत्तर देत सांगितलं की, हे एका डॉक्टरने सांगितलं आहे की, घटस्फोट झाला की, तुम्ही लगेच दुश्मन होता? पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की, किरण राव माझ्या आयुष्यात आली आणि माझा जीवन प्रवास खूप छान झाला.'' त्याचबरोबर किरणने असंही सांगितलं होतं की, त्यांना एकमेकांसोबत काम करणे खूप आवडते. आमिर आणि किरण राव हे बॉलिवूडचं लाडकं कपल होतं. मात्र या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. त्यांच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का होता.