Ira Khan कडून तिच्या बॉलिवूड डेब्यूबाबात मोठा खुलासा... ऐकून चाहत्यांना बसला धक्का

आयरा खान नेहमीच सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडीयावर काही ना काही माहिती किंवा फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

Updated: Mar 4, 2022, 06:02 PM IST
Ira Khan कडून तिच्या बॉलिवूड डेब्यूबाबात मोठा खुलासा... ऐकून चाहत्यांना बसला धक्का title=

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये बरेच स्टार किड्स डेब्यु करत आहेत किंवा करण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्यामध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मुलांच्या डेब्यूची देखील लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. ती कधी या इंडस्ट्रित पाऊल ठेवेल आणि कोणत्या प्रकारच्या सिनेमांमधून ती सर्वांसमोर येईल असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्या नंतर आता आमिरची मुलगी आयरा खानने सोशल मीडियावर तिच्या डेब्यूबद्दल खुलासा केला आहे.

आयरा खान नेहमीच सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडीयावर काही ना काही माहिती किंवा फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. सहसा आयरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर सोबत फोटो शेअर करत असते. परंतु आता आयराने सोशल मीडियावर लोकांच्या प्रश्वावरती वक्तव्य केलं आहे.

अलीकडेच इरा खानने सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांसह इन्स्टाग्रामवर क्वेशन आंसर सेसन आयोजित केलं होतं. ज्यामध्ये आयरा खानने चित्रपटांमध्ये काम करणार की, नाही यासह काही प्रश्नांची उत्तरे दिली. तसे पाहाता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच हेडलाईन्स टाळते. म्हणजे ती काँट्रोवरसीअल गोष्टीं टाळण्याचा प्रयत्न करत असते.

परंतु यावेळेला तिने तिच्या बॉलिवूडमधील डेब्युवर वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे ती आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

आयराला जेव्हा तिच्या बॉलिवूडमधील डेब्युवर विचारले गेले, तेव्हा तिने आपली अशी कोणतीही योजना किंवा प्लान नसल्याचे सांगिते. ज्यामुळे तिला मोठ्या स्क्रिनवर पाहाण्याची इच्छा असणाऱ्या तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

आयरा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असते. जानेवारीमध्ये, आयराने तिच्या बॉयफ्रेंडसोबत जर्मनीच्या सहलीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि गेल्या चार-पाच वर्षांत ती 20 किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले. तिने लिहिले, 'मी अलीकडेच माझे वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू करण्यासाठी 15 दिवस उपवास केला. मात्र माझे 20 किलो वजन वाढले आहे.  खरं तर हा माझ्या स्वत:शी खेळ आहे.'

भाऊ जुनैद पदार्पण करणार आहे
दरम्यान, आमिरचा मुलगा आणि आयराचा खरा भाऊ जुनैद खान लवकरच यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होणाऱ्या 'महाराजा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आमिरची मुलगी नाही पण त्याचा मुलाला मात्र मोठ्या परद्यावर लवकर सर्वांना पाहाता येणार आहे. हा सिनेमा जुनैदचा डेब्यु सिनेमा असणार आहे.