आमिर खानच्या मुलीचं वयाच्या 14 व्या वर्षी लैंगिक शोषण; सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव

या व्हिडिओत ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. 

Updated: Oct 20, 2022, 09:02 PM IST
आमिर खानच्या मुलीचं वयाच्या 14 व्या वर्षी लैंगिक शोषण; सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव title=

मुंबई : अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने यापूर्वी एक व्हिडिओ शेअर करून ती डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता पुन्हा एकदा इराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. खरंतर हा व्हिडिओ जूना आहे पण हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इराने सांगितलं होतं की, वयाच्या १४ व्या वर्षी तिचं लैंगिक शोषण झालं होतं.

इरा खानने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती अनेक मुद्द्यांवर बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये इरा म्हणाली की, 'मी 14 वर्षांची असताना माझं लैंगिक शोषण झालं. त्या व्यक्तीने काय केलं हे मला त्यावेळी समजलं नाही. यावर विश्वास कसा ठेवावा हेच कळत नव्हतं. त्या व्यक्तीला त्याच्या कृतीबद्दल माहिती आहे याची खात्री करण्यासाठी मला एक वर्ष लागलं.'

इरा पुढे म्हणाली, 'हे लक्षात येताच मी ताबडतोब माझ्या पालकांना ईमेल लिहीला आणि मी या परिस्थितीतून बाहेर पडले. एकवेळ जेव्हा मी या सगळ्यातून बाहेर आले तेव्हा मला याचं इतकं वाईट वाटलं नाही. मला आता कसलीच भीती नव्हती.'

आई-वडिलांच्या घटस्फोटावर इरा काय म्हणाली?
इरा म्हणाली, 'मी दु:खी का आहे हे समजू शकले नाही. माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा मी लहान होते. पण त्यामुळे मला असा कोणताही धक्का बसला नाही कारण दोघांनी परस्पर संमतीने शांततेने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही दोघं मित्र होते. आमचे कुटुंब तुटलेलं नाही. घटस्फोटानंतरही दोघंही माझ्याबद्दल आणि भाऊ जुनैदचे निर्णय आमचे पालक एकत्र घेतात.

याशिवाय इरा पुन्हा एकदा तिच्या डिप्रेशनबद्दल बोलली. 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये इराने ती डिप्रेशनमध्ये का गेली हे देखील सांगितलं आहे. इरा जरी चित्रपटांपासून दूर असली तरी तिच्या वडिलांप्रमाणे ती सामाजिक मुद्द्यांवर तिचं मत मांडताना दिसते.