समस्त पतीदेवांनी वाचाच; मेहुणी- पत्नीच्या वाढदिवसांच्या तारखांमुळे Milind Gawali वर आली ही वेळ, आता म्हणतो...

Milind Gawali नं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मिलिंद गवळीनं त्याची पत्नी दिपाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंद गवळीनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

दिक्षा पाटील | Updated: May 11, 2023, 05:42 PM IST
समस्त पतीदेवांनी वाचाच; मेहुणी- पत्नीच्या वाढदिवसांच्या तारखांमुळे Milind Gawali वर आली ही वेळ, आता म्हणतो... title=
(Photo Credit : Social Media)

Milind Gawali : ‘आई कुठे काय करते’ मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही पोस्ट शेअर करत मिलिंद गवळीला अखेर त्याच्या चाहत्यांसोबत पत्नीच्या वाढदिवसाचा कसा घोळ झाला हे सांगितलं आहे. 

पुढे मिलिंद गवळीनं सांगितले की, 'पत्नी दिपा गवळीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मिलिंद गवळीनं तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंदनं शेअर केलेल्या या व्हिडीओत त्यांचे अनेक फोटो आहेत. त्यानं या फोटोंचा एक व्हिडीओ करत आठवणींना उजाळा दिला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मिलिंदनं कॅप्शन दिले की 'दिपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुला सुख ,समृद्धी ,आरोग्य, यश मिळो. सदैव आनंदी रहा, खुश रहा , नेहमी सारखं सतत हसत रहा. अशी ईश्वरचरणी प्रार्थना, आम्हाला अशीच प्रेरित करत रहा, तुझी चिकाटी, जिद्द, energy infectious आहे. अशीच रहा ! आणि नशीबवान आहेस तू , तुला दोन वाढदिवस साजरे करायला मिळतात, वर्षानुवर्ष वाढदिवस 9 मे रोजी साजरा केला जातो. खरं तिचा जन्म 10 मे चा आहे. पण मग का तिचा वाढदिवस एक दिवस आधी 9 मे ला केला जातो, कारण तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे रंजूताईचा वाढदिवस नऊ मे ला असतो, मग मोठ्या बहिणीबरोबर या शेंडेफळाचा म्हणजेच दिपाचा पण वाढदिवस त्याच दिवशी साजरा व्हायचा, आणि वर्षां वर्ष हे असंच घडत होतं, आणि मग ती स्वतः विसरून गेली होती की तिचा जन्म दहा मे चा आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे मिलिंद गवळी म्हणाला, 'त्यामुळे यावर्षी मी मुद्दामून तिच्या जन्मदिवशी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे. एकाच दिवशी दोघांच सेलिब्रेशन करण्या पेक्षा दोन वेगवेगळे सेलिब्रेशनस करायला काय हरकत आहे. किंवा दोन्ही दिवशी ते साजरे करूया. खूप लोकांच्या जन्म तारखेचा घोळ असतो, आणि आधीच्या पिढीचा तर खूप घोळ होता, म्हणजे आमच्या पुरकर काकांची जन्मतारीख वेगळी आणि शाळेतल्या दाखल्यामध्ये जन्मतारीख वेगळी, शाळेत ऍडमिशन साठी वय पूर्ण नसतं म्हणून तारीख बदलायची पूर्वी एक पद्धत होती, मुलाचं वय जास्त आहे असं दाखवलं जायचं, पण नंतर घोळ असा व्हायचा की नोकरीमध्ये ते कमी वय असून सुद्धा ते लवकर रिटायर व्हायचे, बऱ्याचशा लोकांचा जन्म तारखे बरोबर जन्म वेळेचा सुद्धा खूप घोळ झाला आहे.' 

हेही वाचा : Netflix कडून वर्णद्वेष? इजिप्तमध्ये निर्माण झाला मोठा वाद कारण ठरली Queen Cleopatra

पुढे मिलिंद गवळी म्हणाला, 'चुकीची जन्मवेळ दिल्यामुळे जन्म पत्रिकेमध्ये भलतंच भविष्य लिहीलं जायचं. आत्ताच्या पिढीचा तसा घोळ नसावा असं मला वाटतं. आता Precise and exact time of birth दिला जात असावा. पण आता कोणी पत्रिका तयार करत असतील का याचीच मला शंका वाटते. कधी कधी तारखेचे आणि वेळेचे घोळ चांगले हि असतात. Double celebration करायला मिळातं. तर दीपा तुला दोन दोन वाढदिवसाच्या Double शुभेच्छा