AI मुळे ऑस्कर विजेता संगीतकार A.R.Rahman चिंतेत; वाचा नक्की असं घडलंय तरी काय?

A.R.Rehman on AI Tweet: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे एआयची (AI). कृत्रिम बुद्धिमत्ता आता ही आपल्या पुढील समस्या होऊ पाहते आहे की काय अशा प्रतिक्रिया अनेकदा येताना दिसते आहे. सध्या ए.आर.रेहमानही यावर आपली (A.R.Rahman Reaction on AI) प्रतिक्रिया मांडली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 11, 2023, 04:51 PM IST
AI मुळे ऑस्कर विजेता संगीतकार A.R.Rahman चिंतेत; वाचा नक्की असं घडलंय तरी काय?  title=

A.R.Rahman on AI Tweet: ए.आर.रेहमान हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक आणि संगीकार आहे. तो आपल्या लोकप्रिय आणि आगळ्यावेगळ्या गाण्यांसाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरही तो चांगलाच सक्रिय असतो. ट्विटरवरही तो चांगलाच सक्रिय असतो. सध्या त्याचे एक ट्विट (A.R.Rahman) चर्चेत आलं आहे. यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजिन्सचा पसारा वाढू लागला आहे.जवळपास महत्त्वपुर्ण क्षेत्रांमध्ये या कृत्रिम बुद्धिमत्ताचे वावर वाढतो आहे त्यामुळे आता या पुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचेच (AI) वर्चस्व राहणार की काय अशी शंकाही उपस्थित झाली आहे. त्यालाच धरून एक ट्विट संगीतकार ए.आर.रेहेमाननं केलं आहे. या ट्विटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजिन्सला वरदान की शाप असं म्हटलं आहे. 

ए.आर.रेहमानच्या ट्विटनं वेधलं सगळ्याचे लक्ष 

परंतु नक्की एआयमुळे ए.आर.रेहेमान चिंतेत का बरं आला आहे यावर सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यानं त्याच्या ट्विटसह एक व्हिडीओ शेअर केला आहे जो एका चीनच्या शाळेतला आहे. हा व्हिडीओ ए.आर.रेहमाननं 6 मे रोजी शेअर केला आहे. या व्हिडीच्या कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे की कशाप्रकारे चीनमध्ये (China AI Video in School) एआय विकसित केले जात आहे. हा व्हिडीओ वॉल स्ट्रीट जर्नल शेअर केला आहे. यामध्ये दाखवण्यात आले आहे की शाळेत विद्यार्थ्यांनी कपाळावर बॅण्डस लावले आहेत. ज्याचा वापर मुलांची एकाग्रता टिपण्यासाठी होतो आहे आणि त्याच्या शर्टला एक चिपही लावली आहे ज्यातून त्यांचे स्थान नोंदवता येऊ शकते. हा व्हिडीओ आत्तापर्यंत 1 लाख 95 हजार युझर्सनी पाहिला आहे. 

हेही वाचा - आर्थिक मंदीमुळे बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलेला परदेश; आज करतेय नेत्याला डेट

काय आहे ट्विट?

कोण विद्यार्थी किती वेळ त्यांचा फोन चेक करतात किंवा किती वेळ वर्गात जांभई देतात याबद्दल हे तंत्रज्ञान मदत करेल. परंतु हा व्हिडीओ शेअर करत मात्र ए.आर.रेहमाननं चिंता व्यक्त केली आहे. तो म्हणतो की, मला या नव्या पिढीबद्दल खरंच फार वाईट वाटतंय. हा त्यांच्यासाठी शाप आहे की वरदान? ए.आर.रेहमानच्या या व्हिडीओवर (Video Viral) चाहत्यांनी तूफान लाईक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत. एआय शाप की वरदान, असा प्रश्न उपस्थित केल्यावर अनेकांनी आपली मतं मांडली आहे. हे पाहून आपल्याला या लहान मुलांची दयाही येते आहे असंही ए.आर.रेहमाननं म्हटलं आहे. 

मध्यंतरी ए.आर.रेहमानच्या कॉन्सर्टमध्ये पोलिसांनी अडवणूक केल्यामुळे तो बराच चर्चेत आला होता. सध्या त्याचे अनेक शोज सुरू आहेत परंतु काही शोज हे सध्या थांबवण्यात आल्याचे कळते आहेत. ए.आर. रेहमान हा ऑस्कर विजेता कलाकार आहे.