''अगं बाई जरा आवर''; शाहरूखला तिनं नॉनस्टॉप kiss केलं, VIDEO पाहून नेटकरी हैराण

Shah Rukh Khan Kiss Video: चाहत्यांचे प्रेम हे कलाकारांसाठी फारच अमुल्य असते. परंतु या प्रेमाचा अतिभडिमार झाला तर मात्र लोकंही त्यांना ट्रोल केल्याशिवाय राहत नाही. शाहरूख खानसोबत असाच काहीसा प्रसंग घडला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 15, 2023, 01:19 PM IST
''अगं बाई जरा आवर''; शाहरूखला तिनं नॉनस्टॉप kiss केलं, VIDEO पाहून नेटकरी हैराण title=
June 15, 2023 | A female fan kisses shah rukh khan at dubai event netizens trolls her video viral (Photo: Social Media)

Shah Rukh Khan Kiss Video: कलाकार हे कुठे स्पॉट झालेच तर त्यांना पहिल्यांदा कोण भेटतं? तर ते म्हणजे त्यांचे फॅन्स. सोशल मीडियावर असे नाना तऱ्हेचे व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात ज्यात कलाकरांसोबत एक सेल्फी मिळवण्यासाठी चाहत्यांची कोण उत्सुक असतात. कधी कधी चाहत्यांना कलाकारांवर असलेले प्रेमाचे भान इतके हरपून गेलेले असते की त्यांना हे कळतच नाही की आपण सार्वजनिक जीवनात नक्की कसे वागायला हवे. असाच काहीसा प्रकार शाहरूख खानसोबत दुबईमध्ये (Shah Rukh Khan in Dubai) घडला आहे. दुबईमध्ये शाहरूख खान स्पॉट झाल्यावर एका फॅनला विश्वासच बसत नव्हता की ती शाहरूखला भेटली आहे. तिचा हा उत्साह इतका वाढला की तिनं तिथल्या तिथेच शाहरूखला कीस करायला सुरूवात केली परंतु ती काही थांबायचं नावचं घेत नव्हती. 

तिचा हा व्हिडीओ पाहून मात्र नेटकऱ्यांनी तिला आणि शाहरूखला तूफान ट्रोल केले आहे. ''चाहत्यांनी कलाकारांसोबत कुठे कसे वागावे याचे काहीच भान राहिलेले नाही'', असं म्हणत नेटकऱ्यांनी अशा चाहत्यांवर टीका केली आहे. तर काहींनी शाहरूखच्या ''प्रेमापोटी हिला कुठेतरी बंद करून ठेवा'', अशी खोचक कमेंटही केली आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, शाहरूख दुबईमध्ये एका इव्हेंटमध्ये पोहचलेला दिसतो आहे. तेव्हा तो एन्ट्री करताच त्याच्या आजूबाजूला त्याचे फॅन्स गराडा घालतात आणि त्याच्यासोबत सेल्फी घेयला सुरूवात करतात. परंतु तेवढ्यात त्यांच्यातून एक महिला येते आणि शाहरूख खानला विचारते, ''मी तुम्हाला किस करू शकते?'' 

हेही वाचा - मिळून साऱ्याजणी... 'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर प्रदर्शित

तेवढ्यात ती त्याला कीस करू लागते. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे त्यामुळे या व्हिडीओची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. काहींनी यावेळी या महिलेला ट्रोल केलं आहे. तर काही युझर्सनी म्हटलंय की, ''हे जर का एका मुलीसोबत घडलं असतं तर?'' असं म्हणत अनेकांनी पुरूषांची बाजू घेत कमेंट केली आहे. तर अनेकांनी या व्हिडीओकडे पाहून ''ही महिला फारच लकी आहे,'' असं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे शाहरूख खानच्या चाहत्यांमध्येही याची फारच चर्चा रंगली आहे. 

Shah Rukh Khan kissed (forcefully?) by female fan
by u/humanbeing3333 in BollyBlindsNGossip

यावर काही ट्रोलर्सनी फारच भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युझरनं म्हटलंय की, ''शाहरूख खानला कायमच असे फॅन्स भेटतं असतात आणि ते त्यांच्यासोबत असे वागत असतात परंतु तरीही शाहरूख खान किती संयम ठेवतात.'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''जर माधुरी दीक्षितला असं की कीस किंवा गालावर हात लावला असता तर... त्याकडे कोणीच लक्ष दिलं नसतं.''