Shocking News ! 24 वर्षीय निर्मात्यांकडून 48 वर्षीय अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी, ताई म्हणत म्हणत त्यानं...

ती तर पुरती हादरली होती... 

Updated: Jul 9, 2022, 08:36 AM IST
Shocking News ! 24 वर्षीय निर्मात्यांकडून 48 वर्षीय अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी, ताई म्हणत म्हणत त्यानं...  title=
24 year old producer demand sexual favour to 48 years old actress

मुंबई : चित्रपटसृष्टी आणि या झगमगणाऱ्या जगताची एक काळी बाजूही आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही काळी बाजू सातत्यानं समोर आली आहे. मुख्य म्हणजे ही बाजू इतकी विदारक आहे, की ऐकणाऱ्यांनाही एका वळणावर धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. मागील काही वर्षांमध्ये कलाजगतामध्ये घडणारे काही धक्कादायक प्रकार समोर आले. जिथं कास्टिंग काऊचचा शिकार झालेल्यांनी आपल्यावर ओढावलेले प्रसंग प्रकाशात आणले. (24 year old producer demand sexual favour to 48 years old actress)

नुकतंच एका अभिनेत्रीनंही तिच्यासोबत घडलेल्या अशा प्रसंगाकडे लक्ष वेधलं. जिथं तिला सुरुवातीला चित्रपट निर्मात्यानं बहीण म्हणून संबोधलं, तो तिला ताई म्हणू लागला. पण, नंतर मात्र 50 हजार रुपयांच्या बदल्यात त्यानं तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. 

या अभिनेत्रीचं नाव चर्मिला. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती विविध भूमिका साकारते. अशाच एका चित्रपटात तिनं ती आईच्या व्यक्तीरेखेत दिसली होती. तो एक मल्याळम चित्रपट होता, कालिकतमध्ये त्याचं चित्रीकरण झालं होतं. 

चित्रपटाचा निर्माता अतिशय तरुण होता असं सांगताना सुरुवातीला तो आपल्याला मोठ्या बहिणीप्रमाणे वागवत असे, असं तिनं सांगितलं. पण, चित्रीकरणादरम्यान तिसख्याच दिवशी तो अभिनेत्रीच्या असिस्टंटला राखत त्यांच्यामार्फत अभिनेत्रीकडून 50 हजार रुपयांच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली होती. 

पैसे घेऊन आपल्यापैकी कोणा एकाशी शरीरसंबंध ठेवण्याची धक्कादायक ऑफर त्यानं तिला दिली. हे ऐकूनच ती खडबडून उठली. नेमकं काय सुरुये हेच तिच्या लक्षात येईना. 

निर्मात्यांची ही मागणी ऐकून तू माझ्या मुलाहून काही वर्षांनीच मोठा आहेस, असं सांगत तू मला आईसमान लेखलं पाहिजेस असं चर्मिलानं त्याला सांगितलं. पण, तो ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी चर्मिला त्या ठिकाणहून निघाली. 

कोण आहे चर्मिला? 
चर्मिला एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. ती एकट्यानंच मुलाचा सांभाळ करते. 1995 मध्ये तिनं अभिनेता किशोर सत्या याच्याशी लग्न केलं होतं. पण, 4 वर्षांतच त्यांचा संसार मोडला. 

चर्मिलानं यानंतर 2006 मध्ये एका इंजिनियरशी लग्न केलं. पण, हे लग्नही 2014 मध्ये तुटलं. या नात्यातून तिला एक मुलगा झाला. या मुलाचं संगोपन तिनं एकटीनंच केलं. विविध चित्रपटांतून ती बऱ्याच कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली.