या दिवशी शॉपिंग करणे ठरेल शुभ!

 महिला आणि शॉपिंगचे अनोखे नाते आहे

Updated: Apr 10, 2018, 08:27 PM IST
या दिवशी शॉपिंग करणे ठरेल शुभ! title=

मुंबई : महिला आणि शॉपिंगचे अनोखे नाते आहे. कारण शॉपिंग करायला न आवडणारी महिला तशी दुर्मिळच. पण आठवड्यातील कोणता दिवस शॉपिंग करण्यासाटी शुभ आहे? तुम्हाला माहित आहे का? काही ठराविक दिवशी शॉपिंग करणे शुभ मानले जात नाही. खास करुन काळे कपडे, लोखंड, तेल, मीठ आणि इलेक्ट्रोनिक वस्तू खरेदी करु नयेत. जाणून घेऊया शॉपिंगसाठी शुभ दिवस कोणते...

कोणत्या दिवशी कराल शॉपिगं?

शॉपिंगसाठी सर्वात उत्तम दिवस शुक्रवार आहे. याचे कारण म्हणजे शुक्राला धन, ऐश्वर्य, सुख आणि वस्त्राचे कारक मानले जाते. शुक्रवारी नवीन कपडे खरेदी करणे शुभ मानले जाते. तर बुधवार, गुरूवार आणि रविवार हे दिवसही शॉपिंगसाठी उत्तम आहेत. सोमवार मध्यम शुभ मानला जातो.

या दिवशी घालू नका नवे कपडे

नवीन कपडे घालण्यासाठी मंगळवार आणि शनिवार शुभ मानले जात नाहीत. या दोन दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशी तुम्ही नवे कपडे घालू शकता.

कपडे खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या

  • शक्यतो शुभ दिवशी खरेदी करा.
  • कपड्यांवर कोणत्याही प्रकारचा डाग लागू नये याची खबरदारी घ्या. अशा कपड्यांची खरेदी अशुभ असेल.
  • थोडेसेही फाटलेले कपडे विकत घेऊ नका.