विराटच्या हळदीचा व्हिडिओ पाहिला का ?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा बहूप्रतिक्षित विवाहसोहळा इटलीत पार पडला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 12, 2017, 11:02 AM IST
विराटच्या हळदीचा व्हिडिओ पाहिला का ? title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा बहूप्रतिक्षित विवाहसोहळा इटलीत पार पडला. त्यांच्या लग्नाचे गुपित त्यांनी अगदी शेवटपर्यंत गुलदस्तात ठेवले आणि नंतर सोशल मीडियावर फोटोज, व्हिडिओज शेअर करून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. 

काय लिहिले पोस्टमध्ये ?

त्या पोस्ट्मध्ये कोहलीने लिहिले की,"आज एकमेकांच्या प्रेमात कायम राहण्याचे वचन दिले."

लग्नातील विविध विधींचे व्हिडिओज 

साखरपुड्यापासून ते अगदी लग्नातील विविध विधींचे व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. विराटच्या हळदीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात विराट चक्क लाजताना दिसत आहे. या व्हिडिओत विराटचे नातेवाईक त्याला हळद लावत आहेत. बॅकग्राऊंडला पंजाबी गाणे वाजत आहे. मस्त आनंदी वातावरण आहे.
विराटला पंजाबी गाणी खूप आवडतात. अनेकदा विराटने त्याचा उल्लेख देखील केला आहे. 

 

Another one from Haldi! 

A post shared by Virat Kohli (@viratkohli.club) on

 

Haldi time! VC - @letsconvo

A post shared by Virat Kohli (@viratkohli.club) on

 फोटोज सोशल मीडियावर व्हायरल

लग्नसोहळ्याचे खास फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या खास सोहळ्यात दोघेही फार सुंदर दिसत आहेत.