सचिनच्या आयुष्यात २४ तारीख वाढदिवस नाही, तर या गोष्टीमुळे खास

सचिन तेंडूलकरला क्रिकेटमधून निवृत्त होऊन जवळजवळ ६ वर्षे झाली आहेत, परंतु आजही त्याची गौरवशाली खेळी लोकांच्या आठवणीत आहे. सचिन त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातले चाहते सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत

Updated: Apr 25, 2019, 08:28 AM IST
सचिनच्या आयुष्यात २४ तारीख वाढदिवस नाही, तर या गोष्टीमुळे खास title=

मुंबई : सचिन तेंडूलकरला क्रिकेटमधून निवृत्त होऊन जवळजवळ ६ वर्षे झाली आहेत, परंतु आजही त्याची गौरवशाली खेळी लोकांच्या आठवणीत आहे. सचिन त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातले चाहते सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. क्रिकेटमध्ये सचिनने ३४ हजार ३४७ रन केल्या आहेत. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मराठी कुटुंबात मुंबईत झाला. क्रिकेटबद्दल थोडीशीही माहिती असलेल्या जगातील कोणाला सचिनचे नाव माहित नाही, असं नाही. 

२४ तारखेला जन्मलेल्या सचिनचं या तारखेपासून खास कनेक्शन आहे.  २४ मे १९९५ रोजी सचिन तेंडुलकरने अंजलीशी लग्न केले. सचिन आणि अंजली यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी झाला. याचबरोबर सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये २४ तारखेला अनेक रेकॉर्डही केली आहेत. 

१९८९ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सचिनची कारकिर्द २०१३ पर्यंत म्हणजेच २४ वर्ष चालली. २४ फेब्रुवारी १९८८ रोजी सचिन क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झळकला. सचिनने आपला मित्र विनोद कांबळी याच्यासोबत ६६४ रनची पार्टनरशीप केली. हॅरीस शिल्ड स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये सचिनने ३२६ आणि विनोदने ३४९ रन केल्या.  

२४ नोव्हेंबर १९८९ ला सचिनने १६ वर्षांचा असताना आपले पहिले अर्धशतक (५९ रन) झळकवले होते. पाकिस्तानविरुद्धच्या फैसलाबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये सचिनने चमकदार कामगिरी केली. 

२४ फेब्रुवारी २०१० रोजी तेंडुलकरने ग्वाल्हेरच्या कॅप्टन रुप सिंग स्टेडियमवर ऐतिहासिक खेळी केली, ज्याचा कोणी विचार केला नव्हता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० रन केले आणि वनडेमध्ये पहिली द्विशतकी खेळी केली. सचिनने त्या मॅचमध्ये १४७ बॉलमध्ये २५ फोर आणि ३ सिक्स मारले.