Viral News: बापरे! 22 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला गिर्यारोहक त्याच ठिकाणी अचानक समोर आला आणि... ; पाहणारा प्रत्येकजण दचकला

World Viral News: ट्रेकिंग, माऊंटन क्लायंबिंग अशा थराररक आणि साहसी खेळांकडे मागील काही काळापासून तरुणाईचा कल वाढताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Jul 10, 2024, 11:01 AM IST
Viral News: बापरे! 22 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला गिर्यारोहक त्याच ठिकाणी अचानक समोर आला आणि... ; पाहणारा प्रत्येकजण दचकला  title=
(प्रतिकात्मक छायाचित्र) / world news mountain Climber dead body found on Peru mountain peak after 22 years

World Viral News: उंचच उंच डोंगर पाहिले, की त्यांच्या शिखरापर्यंत पोहोचण्याची अनेकांचीच इच्छा होते. या डोंगराच्या शिखरावरून आजुबाजूचा परिसर नेमका कसा दिसत असेल, या एका प्रश्चाचं उत्तर शोधण्यासाठी मग धडपड सुरु होते. याच उत्सुकता आणि कुतूहलापोटी अनेक मंडळी गिर्यारोहणाच्या क्षेत्राकडे वळतात आणि मजल दरमजल करत अनेक पर्वतशिखरं, सुळके सर करतात. मागील काही वर्षांमध्ये ट्रेकिंग आणि माऊंटन क्लायंबिंग अर्थात पर्वतांवरील चढाई यांसारख्या थरारक क्षेत्राकडे मोठ्या वर्गाचा कल दिसून आला. 

असाच एक गिर्यारोहक साधारण 22 वर्षांपूर्वी एका पर्वतावरील चढाईसाठी गेला आणि परतलाच नाही. 22 वर्षांनंतर मात्र तो अनपेक्षितपणे समोर आला आणि पाहणारेही दचकले. दक्षिण अमेरिकेतील पेरू येथील उत्तुंग पर्वतशिखरांपैकी एक असणाऱ्या माऊंट Huascaran वर या अमेरिकी गिर्यारोहकाचा मृतदेह आढळला आणि पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीनही सरकली. 22 वर्षांपूर्वी चढाई करत असताना गिर्यारोहकानं मोहिम सुरु केली खरी पण, तो शिखरावर पोहोचू शकला नाही. तेव्हापासून त्याची कोणतीही माहिती समोर आली नव्हती, त्याचा मृतदेहसुद्धा हाती लागला नव्हता. 

बर्फ वितळला आणि... 

गतिक तापमानवाढीचे परिणाम माऊंट Huascaran वरही दिसू लागले असून, इथं बहुतांश हिमशिखरं वितळण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 22 हजार फूट इतक्या उंचीवर असूनही या पर्वतावरील बर्फ वितळू लागणं ही एक चिंतेची बाब असून, याच प्रक्रियेमुळं एका गिर्यारोहकाचा मृतदेह समोर आला. 

काही गिर्यारोहक या शिखरावर चढाई करत असताना त्यांना हा मृतदेह आढळला आणि त्यांनी तातडीनं यासंबंधीची माहिती बेस कँपला दिली. लगेचच एक पथक पर्वताच्या दिशेनं रवाना झालं आणि त्यांनी मृतदेह खाली आणला, ज्यानंतर या गिर्यारोहकाची ओळखही पटली. 

हेसुद्धा वाचा : Bear Grylls पावला! जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी असतानाही दोन सख्ख्या भावांचा जीव वाचला; आईनं सांगितला थरार...

मूळच्या अमेरिकेतील या गिर्यारोहकाचं नाव विलियम स्टॅम्पफेल. जून 2002 मध्ये त्यानं या पर्वतावरील चढाईसाठी सुरुवात केली. पण, हिमवादळामुळं त्याच्या मोहिमेत अनेक आव्हानं आली आणि त्यातच बर्फाखाली दबल्यामुळं त्याचा मृत्यू ओढावला. प्रचंड शोध घेऊनही विलियमचा काहीच थांगपत्ता लागला नव्हता, त्याचा मृतदेहसुद्धा सापडला नव्हता.

पेरुतील पोलिसांच्या माहितीनुसार विलियम स्टॅम्पफलच्या मृतदेहाचे अवशेष एंडीजच्या कॉर्डिलेरा ब्लँका रेंजवरील बर्फ वितळल्यामुळं आढळले. कैक वर्षांपासून हा मृतदेह बर्फाखाली असल्यामुळं मृत शरीर, कपडे आणि बूट यासह गिर्यारोहकाचा हार्नेस सुस्थितीत होता. इतकंच नव्हे, तर त्याचा पासपोर्टही या ठिकाणी सापडला असून, त्यामुळंच त्याची ओळख पटण्यास मदत झाली. दरम्यान यंदाच्याच वर्षी एप्रिल महिन्यातही या पर्वतशिखरावर अशाच प्रकारे एका गिर्यारोकाचा मृतदेह आढळला होता. तो इस्रायलचं असल्याची माहिती समोर आली होती. 

trekking, Mountain climbing, news, Marathi news, news in marathi, Peru Mountaineering, Peru News, Peru News in marathi, Peru Latest Update, Peru Mountaineering News, Climber's body found on Peru's mountain peak after 22 years, पेरू

पेरुमध्ये गिर्यारोहकांसाठी अनेक उंच पर्वतशिखरं... 

गिर्यारोहणाची आवड असणारी अनेक मंडळी पेरुमध्ये गिर्यारोहण्यासाठी येतात. पेरुच्या पूर्वेला हुस्करन आणि कॅशन अशा पर्वतशिखरांकडे गिर्यारोहकांचा विशेष कल. इथं चढाईसाठी येणाऱ्या प्रत्येकालाच शिखर गाठणं शक्य होतं असं नाही. पण, काही मंडळी मात्र ही आव्हानं पेलत या पर्वतांच्या शिखरांपर्यंत पोहोचतात.