Shocking Car Accident : सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक SUV कार हवेत चार वेळा पलटी मारत. पण कारचा चालक आश्चर्यकारक बचावला जातो. अपघाताचा हा व्हिडिओ कुवैतमधला आहे. कुवैतमधल्या (Kuwait) अल-कबीर गवर्नरेटमध्ये ही घटना घडली. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटतं. हा अपघात इतका भीषण होता की चालक कारच्या बाहेर अनेक फूट उंच फेकला जातो.
अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ अबू अल हसनिया समुद्रकिनारचा (abu-al-Hasaniya Beach) आहे. व्हिडिओत एक एसयूवी कार समुद्रकिनारी वेगाने येताना दिसतेय. पण पाण्याचा वेग वाढल्याने चालक, कार किनाऱ्याच्या आणखी बाजूला घेण्याचा प्रयत्न करतो. पण यात चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटतं आणि एका क्षणात कार पलटी होते. एक दोनवेळा नाही तर कार तब्बल चार वेळा पलटी मारते. पण आश्चर्यची गोष्ट म्हणजे कारमधल्या चालक आश्चर्यकारकरित्या बचावला जातो. कार पलटी मारत (Car Accident) असताना चालक उंच हवेत फेकला जातो आणि समुद्रात पडतो. चालकाल किरकोळ दुखापत झाल्याचं व्हिडिओत पाहिला मिळतंय.
अपघातानंतर सुमद्राच्या पाण्यात पडलेला चालक उठून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने पळतो. त्याला वाचवण्यासाठी अनेक लोकं समुद्रकिनाऱ्याजवळ धाव घेताना या व्हिडिओ दिसतायत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने कार समुद्रातून बाहेर काढण्यात आली. पोलिसांनी कार जप्त केली असून 34 वर्षीय चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
@Kapyoseiin या एक हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळालेत. अनेक लोकांनी कमेंटस्ही केल्या आहेत.
Shocking video shows the moment a 4WD loses control and rolls multiple times on Abu Al Hasaniya Beach in Kuwait, with the vehicle's 34-year-old driver miraculously walking away from the wreckage with minor injuries. pic.twitter.com/bvPNSpVNtv
— M O I B E N S H I R E (@Kapyoseiin) March 31, 2024
लोकांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे, चालकाने सेफ्टी बेल्टचा वापर न केल्याने तो बाहेर फेकला गेला असाव. तर एका युजरने म्हटलंय हा चालक आता वर्षातून दोनवेळा आपला जन्मदिवस साजरा करेल. एका युजरने समुद्रकिनाऱ्यावर स्टंट करणं चांगलंच महागात पडल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.