जगातील शेवटचा Selfie कसा असेल? सोशल मीडियावर धक्कादायक फोटो व्हायरल

सोशल मीडियावर शेवटचे सेल्फी या आशयाचे काही फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही धडकी भरेल.  

Updated: Aug 1, 2022, 06:25 PM IST
जगातील शेवटचा Selfie कसा असेल? सोशल मीडियावर धक्कादायक फोटो व्हायरल title=

Last Selfie On Earth Prediction: आधुनिक काळात प्रत्येकाच्या हाती आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोन क्रेझ इतकं वाढलं आहे की, प्रत्येक जण त्यात डोकं घालून बघताना दिसत आहे. इतकंच काय तर हॉटेलमध्ये गेल्यावर जेवणाचा, एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर फोटो क्लिक करताना लोकं दिसतात. प्रत्येक क्षण मोबाईलमध्ये साठवण्याचा प्रयत्न असतो. आताच्या स्मार्टफोनमध्ये सेल्फी घेण्यासाठी हाय रेझ्युलुशोन कॅमेरादेखील देण्यात आले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अनेक जण सेल्फी घेताना दिसतात. पण सोशल मीडियावर शेवटचे सेल्फी या आशयाचे काही फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही धडकी भरेल.  

खरं तर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर चालणाऱ्या इमेज जनरेटरने जगाचा अंत झाल्यावर शेवटचा सेल्फी कसा दिसेल याचा अंदाज लावला आहे. ही छायाचित्रे 'Robot Overloads' अकाऊंटद्वारे टिकटॉकवर पोस्ट करण्यात आली आहेत. या अकाऊंटच्या अॅडमिनने एआय इमेज जनरेटरला सांगितले की, जेव्हा जगाचा शेवट होत असेल, तेव्हा शेवटचा सेल्फी कसा असेल. इमेज जनरेटर Dall-E 2 ने त्यावर काही धक्कादायक फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोमध्ये विचित्र मानव दिसत आहेत. संबंधित व्यक्ती एलियनसारखे असून त्यांची बोटे लांब असून डोळेही खूप मोठे आहेत. त्यांच्या पार्श्वभूमीवर विध्वंस होत आहे. फोटोमध्ये बॉम्बस्फोटही होत आहेत.