ऑफिसमध्ये ब्रा न घातल्याने महिलेला नोकरीवरून काढलं, मानवाधिकार उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल

 एका महिलेला नोकरीवरून यासाठी काढण्यात आलं की, त्या महिलेने ब्रा घातलेली नव्हती. आता या महिलेने या विरोधात मानव अधिकारांचं उलंघन केल्याचा आरोप केला आहे.

Updated: Sep 4, 2018, 04:46 PM IST
ऑफिसमध्ये ब्रा न घातल्याने महिलेला नोकरीवरून काढलं, मानवाधिकार उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल title=

ओटावा : एका महिलेला नोकरीवरून यासाठी काढण्यात आलं की, त्या महिलेने ब्रा घातलेली नव्हती. आता या महिलेने या विरोधात मानव अधिकारांचं उलंघन केल्याचा आरोप केला आहे, याबाबतीत तिने तक्रार देखील दाखल केली आहे. हे प्रकरण कॅनडामधील आहे.'डेली मेल'ने दिलेल्या बातमीनुसार कॅनडा शहरात अल्बर्टामध्ये क्रिस्टीना शॅनल नावाच्या महिलेच्या ऑफिसमध्ये नवीन ड्रेसकोड लागू करण्यात आला होता. 

ज्यात महिलांना कामाच्या वेळेदरम्यान, ब्रा किंवा अंडरशर्ट घालणे बंधनकारक करण्यात आलं होतं. पण क्रिस्टीनाने हे मानव अधिकारांचं उल्लंघन असल्याचं सांगत. ब्रा घालण्यास नकार दिला, यानंतर त्यांना ऑफिसमधून-कामावरून काढून टाकण्यात आलं.

शॅनलने नोकरीवर काढणाऱ्या बॉसवर, लैंगिक भेदभावाचा देखील आरोप केला आहे, शॅनलनने म्हटलं आहे, असा ड्रेस कोड लागू करणे, 'ज्यात महिलांसाठी ब्रा घालणे आवश्यक आहे. हा एक प्रकारे लैंगिक भेदभाव आहे, म्हणून हे मानव अधिकाराचं प्रकरण आहे.'

२५ वर्षांची शॅनल मे महिन्यापासून एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करत होती. तिने २ वर्षापासून ब्रा घालणे सोडून दिले होते. कारण तिला ब्रा घातल्यावर अनकंफर्टेबल वाटत होतं. शॅनलने म्हटलं आहे की, तिला या गोष्टीचा मात्र अजिबात अंदाज नव्हता की, एकेदिवशी यामुळे तिची नोकरी जाईल.

दुसरीकडे शॅनलला ज्या रेस्तरांमधून नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे, त्याचे मॅनेजर डाऊ रॉब यांचा दावा आहे की, नवे नियम महिलांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आले आहेत.