धक्कादायक! ९० वर्षाच्या महिलेला कोरोनाच्या २ वेगवेगळ्या व्हेरियंट्सची बाधा

 महिलेला कोरोनाच्या २ वेगवेगळ्या व्हेरियंट्सची बाधा

Updated: Jul 12, 2021, 08:59 AM IST
धक्कादायक! ९० वर्षाच्या महिलेला कोरोनाच्या २ वेगवेगळ्या व्हेरियंट्सची बाधा title=

मुंबई : कोविड १९ च्या डबल इन्फेक्शनची उदाहरण जगात आढळायला लागली आहेत. बेल्जियममध्ये एका ९० वर्षीय महिलेला कोरोनाच्या २ वेगवेगळ्या व्हेरियंट्सची बाधा झाली आहे. यात त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण जग हादरलं आहे. (Woman aged 90 died with double variant infection) 

या वृद्ध महिलेला युकेतल्या अल्फा आणि साऊथ अफ्रिकेच्या बिटा व्हायरसची बाधा झाली होती. जगातली ही एकमेव घटना होती. मात्र या घटनेनंतर को इन्फेक्शनचा मुद्दा चर्चेत आहे. युरोपियन क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी काँग्रेसमध्ये या संबंधीचा रिसर्च पेपर सादर झाला आहे. त्यामुळे लसीकरणाबाबतही शंका निर्माण झाल्या आहेत. दुहेरी संक्रमण झालेल्या या महिलेचा मृत्यू अवघ्या 5 दिवसांत झाला होता.

बेल्जियममध्ये  ९० वर्षाच्या महिलेला कोरोनाच्या २ वेगवेगळ्या व्हेरियंट्सची बाधा झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर डबल इन्फेक्शनची जगभरात चर्चा होत आहे. 

को-इन्फेक्शन दुर्लभ, मात्र होतंय 

रिसर्च पेपर यूरोपिय कांग्रेस ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी ऍण्ड इन्फेशियस डिजीजेज (UCCMID) मध्ये या आठवड्यात छापून आलं आहे. हे प्रकरण समोर आल्यावर इन्फेक्शनबाबत नवीन प्रश्न उभे राहत आहेत. एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या संक्रमणाला 'को-इन्फेक्शन' म्हटलं जातं. 

५ दिवसांत झाला मृत्यू 

महिलेचा मृत्यू मार्चमध्ये झाला आहे. या वृद्ध महिलेने लस घेतली होती. तसेच त्या एकट्या राहत होत्या. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुासर, जेव्हा या वृद्ध महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांची ऑक्सिजनची पातळी चांगली होती. मात्र 5 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या श्वसनाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत गेली. टेस्टमधून महिलेला दोन स्ट्रेन्सची संक्रमण झाल्याच उघडकीस आलं.