मगरीने तरुणाला गिळलं, म्हणून मित्रांनी तिच्या तोंडात हात घातला पण... घटनेचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीला त्याचे मित्र मगरीच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. 

Updated: Jun 28, 2022, 06:14 PM IST
मगरीने तरुणाला गिळलं, म्हणून मित्रांनी तिच्या तोंडात हात घातला पण... घटनेचा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई :  मगरींना पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक मानले जाते. ते फक्त पाण्यातच शिकार पकडत नाहीत, तर ते पाण्याबाहेरही शिकार करतात. त्यांचा जबडा इतका शक्तिशाली आणि ताकदवर असतो की, त्यात कोणताही प्राणी किंवा पक्षी अडकला की, त्याची सुटका अशक्यच आहे. मगरीमध्ये इतकी ताकद असते की, ती वाघ, सिंह किंवा हत्तीलाही आपला शिकार बनवते.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो खूपच धक्कादायक आहे आणि तुमच्या अंगावर काटा आणणारा आहे. कारण यामध्ये तुम्ही पाहू शकता की, मगरीने एका व्यक्तीला जिवंत गिळले आहे.

हा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीला त्याचे मित्र मगरीच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्याचा एक मित्र मगरीच्या तोंडात हात घालून मित्राला काढतो, तर दुसरा मित्र मगरीची शेपटी धरुन उभा असतो. हा व्हिडीओ खरोखरंच अंगावर काटा आणणारा आहे.

या व्हिडीओला सोशल मीडियावर लोक शेअर आणि कमेंट्स करत आहेत. तर काहींनी कमेंट्समध्ये हा व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर ही मगर खरी आहे की, खोटी हे काही कळलेलं नाही, परंतु मगरीची काही हालचाल होत नसल्याने आणि मगरीच्या तोंडातील व्यक्ती आरामात असल्यामुळे ही मगर खोट असल्याचे म्हटले जात आहे.

मगरीचा हा व्हिडिओ beauty.wildlifee नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे.