Why Clock Have 12 Hours: असा विचार करा की ठरलेल्या तारखेला तुमची ट्रेन 2 वाजताची आहे. तुम्ही लवकर उठून आवरुन रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी तयारी केली. सामानासहीत तुम्ही 12 वाजता घरुन निघाला. स्टेशनवर पोहोचल्यानंतर तुमच्याकडे बराच वेळ आहे. 2 वाजून गेले तरी तुमची ट्रेन स्थानकावर आली आहे. तुम्ही स्टेशन मास्तरकडे चौकशी करता तेव्हा तुम्हाला समजतं की ट्रेन रात्री 2 वाजताची होती. तुम्ही पहाटे आणि दुपारी म्हणजेच AM आणि PM मध्ये गोंधळ केला आहे. आता असा प्रकार खरोखरच तुमच्याबरोबर किंवा तुमच्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीबरोबर घडला असेल. त्यामुळेच अनेकजण रेल्वे, विमान किंवा इतर कार्यक्रमांचे तिकीट अथवा पास हातात पडल्यानंतर वेळ AM आहे की PM हे फार काळजीपूर्वक पाहतात. बरं हा सारा गोंधळ उडणं किंवा याबद्दल अधिक सक्रीय राहण्यामागील मूळ कारण आहे आपली वेळ मोजण्याची पद्धत. म्हणजेच घड्याळ ज्या नियमांनुसार आपण वापरतो त्या नियमांमुळे अनेकांचा गोंधळ होतो.
भारताबरोबरच जगातील बहुतांश देशांमध्ये 12 तासांची क्लॉक सिस्टीम वापरली जाते. मात्र दिवसात 24 तास असतानाच अनेक देश 12 तासांचं घड्याळ का वापरतात किंवा घड्याळ म्हटल्यावर ते 12 तासांचं का असतं? असा कधी विचार केला आहे का? म्हणजेच थेट 24 तासांचं घड्याळ असतं तर ते अधिक सोयीस्कर झालं असतं आणि अनेकांचा गोंधळ टळला असता असा विचार अनेकांच्या मनात येत असेल. सध्या दिवसाचे 12 की रात्रीचे 12 या गोंधळात अनेकांची विमानं, ट्रेन सुटल्याचा घटना घडल्या आहेत. अर्थात आता ऑनलाइन डिलेव्हरी आणि कालगणनेमध्ये 24 तासांच्या घड्याळाचाचा रेफ्रन्स दिला जातो. मात्र हातातील घड्याळं असो किंवा भिंतीवरील घड्याळं असो त्यामध्ये 12 आकडे असतात.
जाणून घेऊयात घड्याळामध्ये 12 तासच का दर्शवतात. मीडियम वेबसाईटवरील रिपोर्टनुसार प्राचीन मेसोपोटामिया आणि इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीमध्ये या 12 तासांच्या घडळ्याचं मूळ लपलेलं आहे. या संस्कृतीमधील मानवाने दिवसाला 2 टप्प्यांमध्ये विभाजित केलं होतं. दिवसाचा कालावधी आणि रात्रीचा कालावधी. दिवस हा सूर्याच्या परिक्रमेवर मोजला जायचा. तर रात्री ही चंद्राच्या परिक्रमेच्या आधारे मोजली जायची. याच कारणामुळे घड्याळ बनवताना AM आणि PM ची संकल्पना अंमलात आणण्यात आली. इजिप्तमधील लोक हे सूर्याच्या मदतीने दिवस मोजण्याचा आणि वॉटर डायलच्या मदतीने दिवस मोजण्याची सिस्टीम 12 तासांची होती. वॉटर डायल हे एक खास प्रकारचं घड्याळ होतं. या घड्याळ्याच्या मदतीने रात्रीच्यावेळीचा म्हणजेच सुर्यास्त ते सूर्योदयासंदयामधील कालावधी मोजण्याचं काम केलं जायचं.
आता इजिप्तमध्ये त्यावेळी 12 या संख्येचाच का वापर केला जायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. म्हणजे 11 किंवा राऊण्ड फिगर म्हणून 10 किंवा 6-6 चे चार भाग असं का मोजलं जायचं नाही. प्राचीन काळातील लोकांना एका वर्षात 12 लूनार सायकल असतात. तसेच त्यावेळी लोक हातावर संख्या मोजताना 12 ची काऊंटींग सिस्टीम वापरायचे. आज आपण 10 ची काऊंटींग सिस्टीम वापरतो. आपल्याला 10 बोटं आहेत तर सरळ 10 ची सिस्टीम आता आपण वापरतो. मात्र आधी लोक बोटांवरील पेरांच्या आधारे मोजणी करायचे. त्यामुळेच त्यांनी इतर बोटांवरील पेर मोजण्यासाठी वापरला जाणारा अंगठा वगळून इतर चार बोटांवरील प्रत्येकी तीन या पद्धतीने 12 च्या पटीत मोजणी करायची सिस्टीम सुरु केली. खाली दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला ही संकल्पना नेमकी काय होती हे समजेल.
24 तास मोजण्याची सिस्टीम सध्या चांगली वाटत असली तर मागील अनेक शतकांपासून 12 ची सिस्टीम वापरली जात आहे. तसेच वर्तुळामध्ये 12 आकडे दाखवणं हे 24 आकडे दाखवण्यापेक्षा अधिक सुटसुटीत आहे. त्यामुळे आता 12 ची सिस्टीम अचानक बदलणे शक्य होणार नाही. तरीही इंटरनेटवरील व्यवहारांमध्ये हळूहळू 24 तासांची सिस्टीम लागू करण्यात आली आहे.