Honeymoon : लग्न झाल्यानंतर नातेवाईकांकडून आपल्याला एक गोष्ट हमखास विचारण्यात येते ती म्हणजे काय मग हनिमूनला (Honeymoon Places) कुठे जाणार? तुम्हालाही अनेकांनी असा प्रश्न विचारला असेलच. हनिमून ही संकल्पना आपल्यासाठी पाश्चात्त्यच परंतु जगाच्या पाठीवर हनिमूनची कल्पनाही आता दिवसेंदिवस बदलत जाते आहे. अशाच एक विचित्र हनिमून परंपरेचे ह्या देशात पालन केले जाते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल परंतु येथे हनिमूनच्या रात्री चक्क नवरदेव आणि त्याच्या नववधूसोबत आईही (Mother Sleeps with Newly Weds) झोपायला येते. हो, तुम्ही एकदी बरोबर ऐकलंत. हनिमूनची रात्र ही नव्या नवऱ्यासाठी आणि त्याच्या नववधूसाठी अत्यंत खाजगी असते. लग्नानंतर शारिरीक संबंधांच्या दृष्टीनं हनिमूनकडे पाहिले जाते. त्यासाठी नवरा - नवरीची बेडरूम सजवण्यापासून ते त्यांच्यासाठी केशराचे दूध करण्यापर्यंत मोठी तयारी कुटुंबीय करताना दिसतात. (weird tradition of honeymoon in africa tribe where mother sleeps with newly wed couple)
परंतु आम्ही ज्या हनिमून परंपरेबद्दल सांगणार आहोत ती परंपरा अत्यंत वेगळी आणि आश्चर्यात पाडणारी आहे. परंपरा ही फार जुनी असते त्यामुळे त्याचे महत्त्व नव्या पिढ्यांना पटवून देणे महत्त्वाचे असते असं म्हणतात. परंतु आफ्रिकेच्या आदिवासी (Africa) भागातील ही परंपरा तर बुचक्यात पाडणारी आहे असे आपल्याला वाटेल. पण त्यांच्यासाठी ही परंपरा जुनी असून येथे त्या परंपरेचे पालन केले जाते. आफ्रिकेतील अदिवासी पाड्यात लग्न झालेल्या जोडप्यांच्या हनिमूनच्या रात्री चक्क आईही त्यांच्यासोबत एकाच वेळी एकाच बेडवर असते.
हनिमूनच्या रात्री नवरदेवासोबत आणि नववधूसोबत मुलीची आईही (Bridegroom Mother sleeps with Her Husband) झोपते. त्या रात्री फक्त ते दोघंच नसतात तर मुलीची आईही त्यांच्यासोबत त्या रात्री पुर्णवेळ त्यांच्यासोबत असते. जर का मुलीची आई हयात नसेल तर तिच्याजागी एक वृद्ध व्यक्ती अथवा महिला त्यांच्यासोबत संपुर्ण रात्र असते. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल हे खरं परंतु नक्की ही परंपरा आहे तरी का आणि येथे या परंपरेचे पालन का बरं केले जाते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. यामागे त्यांच्यादृष्टीने काही कारणं आहेत म्हणून तिसरी व्यक्ती त्यांच्यासोबत म्हणजे नवरदेवासोबत आणि नवरीसोबत असते.
नवीन लग्न झालेल्या जोडप्यासोबत झोपणारी व्यक्ती ही नव्या जोडप्यांना वैवाहिक जीवनाचे महत्त्व पटवून देते. त्यांना आपल्या वैवाहिक जीवनाची (Marriage Life) सुरूवात कशी करायला हवी, त्यांनी कोणकोणत्या गोष्टीचे पालन करायला हवे याबद्दल त्यांच्यामध्ये चर्चा होते. या तिसऱ्या वडिलधाऱ्या व्यक्तीचे काम येथे एका गुरूचे असते जे वैवाहिक जीवनातील योग्य आणि अयोग्यतेबद्दल त्यांना सांगते.