जिनिव्हा : जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कडून रविवारी dexamethasone या औषधाच्या उत्पादन प्रक्रियेत झपाट्यानं वाढ करण्यावर भर देण्यात आला. वैद्यकिय चाचण्यांनंतर या औषधाचा वापर गंभीर स्वरुपाच्या coronavirus कोरोना रुग्णासाठी केल्यास त्याचा फायदा होऊन रुग्णाचे प्राण वाचवता येत असल्याचं सिद्ध होताच हा निर्णय घेतला गेला.
ऑक्सफर्ड विद्यापीठातून करण्यात आलेल्या संशोधनामध्ये dexamethasone हे औषध काही ठराविक मात्रेमध्ये विविध प्रकारच्या ऍलर्जी, अस्थमा (दमा), काही प्रकारचे कॅन्सर अशा रोगांवर वापरलं जातं. याच औषधावर जवळपास १० दिवस संशोधन केल्यानंतर व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या कोविड रुग्णाला वाचवता येऊ शकतं असं सिद्ध झालं आहे.
सध्याच्या घडीला हे निष्कर्ष प्राथमिक स्वरुपाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध होणं प्रतिक्षेत आहे. पण, निकालस्वरुपी हाती आलेले निष्कर्ष हे सकारात्मक असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे.
प्राथमिक स्तरावर ही चाचणी २१०० कोविड रुग्णांवर करण्यात आली, ज्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरु होते. त्याव्यतिरिक्त ४३०० कोरोना संशितांवर, ज्यांना कोरोनाचे उपचार दिलं जाणं अपेक्षित आहे अशा रुग्णांवर ही चाचणी करण्यात आली. याचविषयी जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालकांनीही माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
'dexamethasone या औषधामध्ये कोविड रुग्णाचे प्राण वाचवण्याची क्षमता आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. आता पुढील आव्हान आहे ते म्हणजे या औषधाचं उत्पादन वाढवण्याचं आणि ते जागतिक स्तरावर सर्वाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं', असं ते म्हणाले.
...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना
dexamethasone या औषधामुळं कोणतंही नुकसान होत नसल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली. पण, पोटदुखी, डोकेदुखी, झोपेचा अभाव आणि नैराश्य असेही या औषधाचे दुष्परिणाम असू शकतात ही बाब मात्र त्यांनी अधोरेखित केली नसल्याचं वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं आहे.