चीनला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारचा हा मास्टरप्लान

मोदी सरकार असा देणार चीनला दणका

Updated: Jun 22, 2020, 06:37 PM IST
चीनला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारचा हा मास्टरप्लान title=

नवी दिल्ली : भारत-चीन सीमा वादावर मोदी सरकार लवकरच संपूर्ण देशात चिनी वस्तूंवर बंदी घालू शकते. केंद्र सरकारने ट्रेड चेंबर असलेले CII,FICCI,ASSOCHAM यांना ई-मेलच्या माध्यमातून चीन आणि इतर काही देशांकडून आयात होणाऱ्या वस्तूंची यादी मागवली आहे.

केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून एक योजना तयार केली आहे. ज्यामध्ये अतिमहत्त्वाच्या नसलेल्या वस्तूंचं आयात रोखण्यासाठी टॅरिफ बॅरियर (ड्यूटी वाढवणं) आणि नॉन टॅरिफ बॅरियर लागू करुन आयात थांबवणं हा सरकारचा हेतू आहे.

सरकारने इतर देशांमधून आयात होणाऱ्या ३०० वस्तूंची यादी याआधीच तयार केली आहे. देशात या वस्तूंची आयात रोखण्यासाठी देखील योजना आखली जात आहे. असं म्हटलं जात आहे की, अत्यावश्यक वस्तू, औषधं आणि काही कच्चा माल सोडून इतर वस्तूंची आयात कमी केली जाईल.

आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत, सरकार आता वस्तूंवर कंट्री ऑफ ऑरिजिन लिहिणं अनिवार्य करणार आहे. म्हणजेच वस्तू कुठे बनवण्यात आली आहे याची माहिती त्या वस्तूवर द्यावी लागणार आहे. सरकारच्या GeM पार्टलवर देखील काम सुरु आहे. ज्यामुळे ग्राहकांना याची माहिती मिळेल की ते कोणत्या देशात बनलेली वस्तू खरेदी करत आहेत.

याशिवाय सरकार तैवान, सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशिया मधून येणाऱ्या वस्तूंची देखील यादी तयार करत आहे.